जल जिवन मिशन अंतर्गत कामाची चौकशी कराः- विजयराव पौळ माजी पंचायत समिती सदस्य.
जल जिवन मिशन अंतर्गत कामाची चौकशी कराः- विजयराव पौळ माजी पंचायत समिती सदस्य.
-------------------------
रिसोड प्रतिनिधी
रणजीत सिंह ठाकुर
-------------------------
रिसोड तालुक्यातील मांगवाडी येथील, जल जीवन मिशन अंतर्गत कामाची चौकशी करून, ग्रामस्थांना पाणीपुरवठा उपलब्ध करून द्यावा! अशी मागणी विजय पौळ माजी पंचायत समिती सदस्य यांनी केली आहे. सविस्तर वृत्त असे की, मांगवाडी येथील ग्राम मांगवाडी, तालुका रिसोड जिल्हा वाशिम येथील गावकऱ्यांनी मांगवाडी येथे अंदाजपत्रकानुसार जल जीवन मिशन योजनेचे काम झाले नसल्याचे म्हटले आहे. कामाची मुदत ही माहे जुलै 2024 मध्ये संपली असून सदर काम करतेवेळी गावातील रस्ते फोडले असून त्यामुळे गावातील लोकांना येण्या जाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच जल जीवन मिशन अंतर्गत काम अर्धवट झाले असून सदर योजनेअंतर्गत आज पर्यंत गावात पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. असे या निवेदनावर आपली स्वाक्षरी करणारे मा. प.स. विजय पौळ, विनोद रामराव बाळके सरपंच, गजानन भिकाजी मोरे उपसरपंच, लता सिताराम वाळके सदस्य, विठ्ठल विष्णू कांबळे, पाटील समाधान, सखाराम वाळके, माधव विश्वनाथ वाळके, भास्कर निवृत्ती कोकाटे, दिलीप कोकाटे, प्रकाश वाळके, संजय कोकाटे, मारुती गव्हाणे, इत्यादी लोकांनी निवेदनावर सह्या केले आहेत. अर्धवट सोडलेले काम पूर्ण करून गावाला पाणी पुरवठा करावा अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे. उन्हाळ्याचे दिवस आले असून संपूर्ण मांगवाडी गावाला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे? गावात जलजीवन मिशन योजनेचे काम करणाऱ्या ठेकेदाराला सदर योजने बाबत विचारपूस केली असता त्यांनी उडवा उडवी ची उत्तरे दिली तरी, सदरील कामाची आपल्या स्तरावरून चौकशी करून आम्हाला योग्य तो न्याय मिळवून द्यावा! व जलजीवन मिशन अंतर्गत गावात सुरळीत पाणीपुरवठा करावा. तसे न झाल्यास गावकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील या निवेदना मध्ये देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रती रिसोड मालेगाव मतदारसंघाचे आमदार अमित झनक, विधान परिषदेच्या आमदार भावनाताई गवळी, मा. गुलाबराव पाटील, इत्यादी लोकप्रतिनिधींना देण्यात आल्या असून प्रशासकीय स्तरावर जिल्हाधिकारी वाशिम, मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. वाशिम, तहसीलदार रिसोड, गट विकास अधिकारी पं. स. रिसोड, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग वाशिम, जीवन प्राधिकरण अधिकारी वाशिम, इत्यादींना निवेदन देण्यात आले परंतु अद्याप पर्यंत संबंधित विभागावर याचा कोणताही परिणाम झाला नसून जल जीवन मिशन विभाग अद्यापही झोपेचे सोंग घेत असून गावकऱ्यांना मात्र पाण्यासाठी झोप येत नाही रात्री अपरात्री पाण्यासाठी बाहेर जावे लागते उन्हामध्ये मोटरसायकलवर अनेक किलोमीटर वरून पाणी आणावे लागते हे गावकऱ्याचे दुर्दैव पाणीपुरवठा विभागाने लवकर जागी होऊन गावकऱ्यांना पाणीपुरवठा करून दिलासा द्यावा अशी मागणी विजयराव पौळ यांनी केली आहे.
Comments
Post a Comment