टोप येथे आढळला पोवळा जातिचा साप.
टोप येथे आढळला पोवळा जातिचा साप.
----------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
----------------------
टोप येथील वेताळमाळ परिसरात संग्राम पोवार यांच्या घराशेजारी पोवळा साप आढळला. पोवार यांनी सापाला पकडून सर्पमित्र किरण चौगुले, ओंकार पाटील यांच्या ताब्यात दिले. त्यांनी त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.सर्पमित्र किरण चौगुले म्हणाले, या सापाच्या तोंडावर काळा पट्टा तर शेपटीला दोन काळे पट्टे असतात. त्यामुळे या सापाचे तोंड कोणत्या दिशेला आहे, हे सहजपणे लक्षात येत नाही. तो आकाराने वाळ्यापेक्षा साधारण थोडा मोठा असतो. इंग्रजीत त्याला 'कोरल स्नेक' म्हटले जाते.
Comments
Post a Comment