कौलव कृषी मंडळ कार्यालय अतिक्रमणाच्या विळख्यात, शेतकऱ्यांची गैरसोय होण्याची शक्यता.

 कौलव कृषी मंडळ कार्यालय अतिक्रमणाच्या विळख्यात, शेतकऱ्यांची गैरसोय होण्याची शक्यता.

------------------------------------ 

राधानगरी प्रतिनिधी 

विजय बकरे

------------------------------------ 

राधानगरी तालुक्यातील कौलव येथील तालुका कृषी मंडळ कार्यालय सध्या अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. कौलव ग्रामपंचायत आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या गंभीर विषयाकडे वेळीच लक्ष न दिल्याने कार्यालयाच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे या महत्त्वपूर्ण कार्यालयाचे कामकाज बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राधानगरी तालुक्यातील कृषी कार्यालय हत्तीमहल येथे तालुक्यांच्या एका टोकाला असलेल्या ने अनेक शेतकरी शासनाच्या योजनाचा लाभ मिळण्यासाठी झगडावे लागत होते याची दखल कौलवचे भूमिपुत्र आणि तालुका कृषी अधिकारी नामदेव परिट यांच्या प्रयत्नातून गावाला हे विभागीय कृषी कार्यालय मिळाले होते. कार्यालयामुळे राधानगरीच्या हातिमहल येथील कार्यालयात जाणाऱ्या जवळपास एकोणसाठ गावांतील शेतकऱ्यांची मोठी सोय झाली होती. शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ सहज मिळू लागला होता. मात्र, आता याच कार्यालयाच्या जागेवर अतिक्रमण होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

अतिक्रमण हटवण्यासाठी ग्रामपंचायत आणि तालुका कृषी विभागाने तातडीने कार्यवाही करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. वेळीच लक्ष न दिल्यास शेतकऱ्यांसाठी असलेले हे महत्त्वाचे कार्यालय बंद पडू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांची मागणी:

 * ग्रामपंचायतीने तातडीने अतिक्रमणे हटवावीत.

 * कृषी विभागाने कार्यालयाच्या जागेची सुरक्षा सुनिश्चित करावी.

 * शेतकऱ्यांच्या सोयीसाठी कार्यालयाचे कामकाज सुरळीत ठेवावे.

या गंभीर विषयावर तातडीने कार्यवाही न झाल्यास, शेतकऱ्यांसाठी असलेले हे महत्त्वाचे कार्यालय बंद पडण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची मोठी गैरसोय थांबवावी अशी मागणी प्रकाश हुजरे ,विष्णू केशव पाटील, आनंदा दगडू चरापले बापू आनंदा कमरे, सागर सुभाष पाटील आदींनी केली आहे

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.