कांटे करंजफेण महामार्गावर थळ्याचा मळा येथे अपघात होऊन युवकाचा मृत्यू.
कांटे करंजफेण महामार्गावर थळ्याचा मळा येथे अपघात होऊन युवकाचा मृत्यू.
----------------------------------
शाहूवाडी प्रतिनिधी
आनंदा तेलवणकर
----------------------------------
शाहुवाडी : तालुक्यातील कोल्हापूर ते अनुस्कुरा या राज्य महामार्गावर कांटे फाटा ते करंजफेण यांच्या मध्ये थळ्याचा मळा येथे झालेल्या अपघातामध्ये कणेरी पैकी पोवारवाडी (ता. पन्हाळा) येथील धनाजी गोविंद पोवार (वय ३४) या युवकाचा मृत्यू झाला. याबाबत अधिक माहिती अशी की, धनाजी पोवार हे आपली पत्नी सौ. श्वेता पोवार यांना कामावर सोडण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा या ठिकाणी गेले होते. त्यांना सोडून ते परत येत असताना दुपारी तीन वाजताच्या दरम्यान कांटे येथील थळ्याचा मळा येथील रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका वाळलेल्या झाडाची फांदी तुटून त्यांच्या अंगावर पडल्याने त्यांचा गाडीवरील ताबा सुटून गाडीवरून पडल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला होता. एक तासापेक्षा अधिक वेळ झाला तरी त्यांना कोणीही मदत केली नाही. परंतू सदर घटनेची माहिती करंजफेण येथील पुढारीचे पत्रकार संजय पोवार व कांटे येथील पोलिस पाटील जगदीश पाटील यांना या घटनेची माहितीच तात्काळ घटनास्थळी भेट देऊन त्यांनी १०८ ॲम्बुलन्सला फोन करून व त्या दोघांनी कोल्हापूर येथील सीपीआर येथे त्यांनी दाखल केले. मात्र त्यांना मृत घोषित करण्यात आले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पाठीमागे पत्नी, मुलगी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.
चौकट - कासारी खोऱ्यामध्ये कळे ते मलकापूर या 64 किलोमीटरच्या अंतरावर एकही ॲम्बुलन्स नसल्यामुळे अपघात प्रसंगी व्यक्तीला तडफडून मरावे लागते आहे.तरी करंजफेण या ठिकाणी 108 ॲम्बुलन्सची गरज असल्यामुळे तात्काळ 108 ॲम्बुलन्स मिळावी. तसेच महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी जातीने लक्ष द्यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार संजय पोवार यांनी मांडली. तसेच पुन्हा एकदा अशी घटना घडण्यापूर्वी रस्त्यालगत असणारी धोकादायक झाडे वाळलेल्या फांद्या काढण्याची मागणी वाहनधारकातून होत आहे तरी संबंधित खात्याने याकडे लक्ष देऊन धोकादायक व वाळलेल्या फांद्या लवकरात लवकर काढून टाकाव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे
Comments
Post a Comment