होसूर ट्रक दुर्घटनेतील आरोपीला अटक.
होसूर ट्रक दुर्घटनेतील आरोपीला अटक.
--------------------------------
चंदगड प्रतिनिधी
आशिष पाटील
--------------------------------
कोवाड पोलिसांनी चोवीस तासात आरोपीला ठोकल्या बेड्या
चंदगड (प्रतिनिधी) : ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचे दोन तुकडे होऊन दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना गुरुवारी (दि.२७) बेळगाव-कोवाड मार्गावर होसूरनजीक (ता.चंदगड) घडली होती. यातील आरोपी ट्रक ड्रायव्हर फरार झाला होता. त्याला कोवाड पोलिसांनी चोवीस तासात पकडण्यात यश आले आहे. यातील ट्रक (नंबर KA 22 - D - 5540) तथा आरोपी ट्रक चालक आनंद शिवपुत्र दुगाइ (वय 34, रा. मनगुत्ती, ता. हूक्केरी, जि बेळगाव) हे उचगाव (ता.जि. बेळगाव) येथे असल्याचे समजले असता तेथे जावून त्याला अटक करण्यात आली आहे.
घटनेचा तपशील असा की, गुरुवारी (दि.२७) सायंकाळी बेळगाव-कोवाड मार्गावर होसूरनजीक (ता.चंदगड) एका ट्रकने बेळगांवहून किणीकडे येणाऱ्या दुचाकीला जोरदार धाकड दिली. त्यामध्ये दुचाकीचे दोन तुकडे झाले आणि चालक फेकला जाऊन गंभीर जखमी झाला. दुचाकीवर मागे बसलेला यातून सुदैवाने बचावला. किसन मारुती साळुंखे (वय २२, रा.शिवनगे, ता.चंदगड) असे जखमीचे नाव आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अज्ञात ट्रक चालकाविरोधात कोवाड (चंदगड) पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पोलीस हवलदार जे.आय. मकानदार व पोलीस कॉस्टेबल खुशाल शिंदे यांनी तपास सुरू केला. दरम्यान, बेळगांव जिल्ह्यातील बेकीनकेरे-उचगाव भागात शोध घेतला असता या गुन्हयातील ट्रक सापडला. त्यानंतर उचगाव येथे आरोपीस अटक करण्यात आली. या गुन्ह्याचा वाहनाचा 24 तासात शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्यात मकानदार आणि शिंदे यांनी तपास केला.
Comments
Post a Comment