आदिवासी सांस्कृतिक महोत्सव. कोरपना तेथे संपन्न.
आदिवासी सांस्कृतिक महोत्सव. कोरपना तेथे संपन्न.
-----------------------------------
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
मंगेश तिखट
------------------------------------
राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आणि आदिवासी विकास विभागाच्या सहकार्याने काल दि. ३१ मार्च रोजी कोरपना येथे भव्य आदिवासी लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
कोरपना शहरात पहिल्यांदाच झालेल्या या ऐतिहासिक अशा कार्यक्रमाला राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ना. ॲड. आशिषजी शेलार, राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. प्रा. डॉ. अशोक उईके आणि राज्याचे माजी मंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
माझ्या मतदार संघातील कोरपना तालुका हा आदिवासी बहुल आहे. या मतदारसंघात आदिवासी बांधवांच्या परंपरागत लोककलेला व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम महत्वपूर्ण ठरला. राजुरा विधानसभेतील सर्वाधिक पेसा ग्रामपंचायती असणाऱ्या कोरपना तालुक्याच्या विकासासाठी पालकमंत्री ना. अशोकजी उईके हे अग्रणी राहून सहकार्य करतील तर शहरात अत्याधुनिक सुविधायुक्त सांस्कृतिक सभागृह व नजिकच्या मानिकगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी ना. ॲड. आशिषशेलार हे विशेष लक्ष घालतील अशी आशा व्यक्त केली. प्रसंगीच मंत्रीमहोदयांनीही सकारात्मक प्रतिसाद देत आम्ही सदैव तुमच्यासोबत आहोत असे आश्वासित केले.
महोत्सवाच्या सुरवातीला पारंपरिक आदिवासी नृत्यासह शहरातून भव्य मिरवणूक निघाली. स्थानिकांनी ठिकठिकाणी मंत्रीमहोदयांचे स्वागत केले. याचवेळी मंत्री महोदयांनी आमच्या कोरपना येथील . सुधीर मुनगंटीवार सेवा केंद्र तथा भाजपा जनसंपर्क कार्यालयास ही भेट देऊन केंद्राचे सेवाकार्य समजून घेतले.
या कार्यक्रमाला मंचावर आमचे नेते, राज्याचे माजी मंत्री आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार, भाजपचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे, उपविभागीय अधिकारी रविंद्र माने, तहसीलदार पल्लवी आखरे, मुख्याधिकारी येमाजी धुमाळ, प्रकल्प अधिकारी राचलवार, भाजपच्या आदिवासी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अरूण मडावी, तालुकाध्यक्ष संजय मुसळे, तालुका महामंत्री सतिश उपलेंचवार, अमोल आसेकर, प्रमोद कोडापे, वाघूजी गेडाम, विजय रणदिवे, पुरुषोत्तम भोंगळे, किशोर बावणे, आशिष ताजने, मनोज तुमराम, तिरूपती किन्नाके यांचेसह कोरपना तालुक्यातील नागरीकांची मोठी उपस्थिती होती.
Comments
Post a Comment