अक्षर मानव अमरावतीच्या जिल्हाध्यक्षपदी भारत मलवार यांची नियुक्ती.
अक्षर मानव अमरावतीच्या जिल्हाध्यक्षपदी भारत मलवार यांची नियुक्ती.
--------------------------------
अमरावती जिल्हा प्रतिनिधी
गजानन जिरापुरे
--------------------------------
तिवसा:- अक्षर मानव संघटनेच्या अमरावती जिल्हाध्यक्षपदी तिवस्याचे भारत मलवार यांची निवड करण्यात आली. आजपासुन ते जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी स्विकारतील.
हि घोषणा अक्षर मानव महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण जावळे यांच्या परवानगीने संघटनेचे राज्य कार्यवाह तथा पालकमंत्री अक्षर मानव विदर्भ आझाद खान यांनी ही घोषणा केली. त्यांनी भारत मलवार यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
अक्षर मानव जात, धर्म, पंथ, लिंग, भाषा, प्रदेश असे सारे भेद दुर करुन माणूस सजग,निर्मळ व्हावा यासाठी संघटना काम करते माणूस हा निव्वळ माणूस म्हणून जगू शकतो या साठी धडपडते साहित्य,समाज, आरोग्य, कला, शिक्षण,श्रम, विज्ञान, अश्या मानवी जीवन जगण्याच्या 70 विषयात संघटना काम करते. कुटुंब आणि समाजव्यवस्था दुरुस्त करणारी अक्षर मानव संघटना आहे. संपूर्ण महाराष्ट्रात माणसानं साठी काम करणारी एकमेव संघटना आहे. असे राज्य कार्यवाह आझाद खान यांनी शुभेच्छा देवून माहिती दिली.अक्षर मानवाच्या कार्याला आता अधिक बळकटी येईल असा विश्वास संघटनेच्या सर्व राज्य पदाधिकाऱ्यांनी विश्वास व्यक्त केला आहे.
भरत मलवार हे संघटनेचे मुल्यांना समर्पित असलेले कर्तृत्ववान, प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. अमरावती जिल्ह्यात त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात, गावात व्यक्तिने जुळून त्यांचे हात मजबूत करावे. असे संघटनेच्या वतीने आवाहन करण्यात आले.
Comments
Post a Comment