पंचगंगा स्मशानभूमीतील दानपेटीत 1 लाख 61 हजार जमा.
पंचगंगा स्मशानभूमीतील दानपेटीत 1 लाख 61 हजार जमा.
----------------------------------कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
----------------------------------
कोल्हापूर ता.01 :- कोल्हापूर महानगरपालिकेच्या पंचगंगा, कसबा बावडा, कदमवाडी व बापट कॅम्प येथे स्मशानभुमी आहेत. याठिकाणी महापालिकेच्यावतीने मोफत अंत्यसंस्कार करण्यात येतात. पंचगंगा स्मशानभूमी व इतर ठिकाणी गुप्तदान पेटया ठेवण्यात आल्या आहेत. स्मशानभूमीत अंत्यसंस्कार आणि रक्षाविर्सजनासाठी येणारे नागरीक या दानपेटीत सढळ हाताने दान करतात. या गुप्तदान पेटया दरवर्षी मार्च अखेरीस उघडण्यात येतात. पंचगंगा स्मशानभूमी येथील गुप्तदान पेटी मंगळवारी मुख्य आरोग्य निरिक्षक डॉ.विजय पाटील, माजी नगरसेवक ईश्वर परमार, आरोग्य निरीक्षक (स्मशान) सुशांत कांबळे, सुरज घुणकीकर, लेखापाल विभागाचे राजु देवार्डेकर, विजय मिरजे, मुकादम व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत उघडण्यात आली. या दानपेटीमध्ये रु.1,61,537/- इतकी रक्कम जमा झालेली आहे.
यापूर्वी माहे मार्च 2024 मध्ये स्मशानभूमीकडील दानपेटी उघडण्यात आल्या होत्या. यामध्ये पंचगंगा स्मशानभूमीकडे तब्बल रु.2 लाख 8 हजार इतकी रक्कम दान स्वरुपात दानपेटीत प्राप्त झालेली होती. स्मशानभूमीकरिता दानशूर व्यक्ती, तरुण मंडळे, नागरिक यांचेकडून शेणी, लाकूड दान करणेस मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळतो. त्याचबरोबर दानपेटीतही प्रचंड उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळालेला आहे. याबद्दल सर्व दानशूर व्यक्तींची महानगरपालिका आभारी आहे.
Comments
Post a Comment