Posts

Showing posts from April, 2025

टोप येथे आढळला पोवळा जातिचा साप.

Image
टोप येथे आढळला पोवळा जातिचा साप. ---------------------- कुंभोज प्रतिनिधी  विनोद शिंगे ---------------------- टोप येथील वेताळमाळ परिसरात संग्राम पोवार यांच्या घराशेजारी पोवळा साप आढळला. पोवार यांनी सापाला पकडून सर्पमित्र किरण चौगुले, ओंकार पाटील यांच्या ताब्यात दिले. त्यांनी त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.सर्पमित्र किरण चौगुले म्हणाले, या सापाच्या तोंडावर काळा पट्टा तर शेपटीला दोन काळे पट्टे असतात. त्यामुळे या सापाचे तोंड कोणत्या दिशेला आहे, हे सहजपणे लक्षात येत नाही. तो आकाराने वाळ्यापेक्षा साधारण थोडा मोठा असतो. इंग्रजीत त्याला 'कोरल स्नेक' म्हटले जाते.

कांटे करंजफेण महामार्गावर थळ्याचा मळा येथे अपघात होऊन युवकाचा मृत्यू.

Image
कांटे करंजफेण महामार्गावर थळ्याचा मळा येथे अपघात होऊन युवकाचा मृत्यू. ---------------------------------- शाहूवाडी प्रतिनिधी  आनंदा तेलवणकर ---------------------------------- शाहुवाडी : तालुक्यातील कोल्हापूर ते अनुस्कुरा या राज्य महामार्गावर कांटे फाटा ते करंजफेण यांच्या मध्ये थळ्याचा मळा येथे झालेल्या अपघातामध्ये कणेरी पैकी पोवारवाडी (ता. पन्हाळा) येथील धनाजी गोविंद पोवार (वय ३४) या युवकाचा मृत्यू झाला. याबाबत अधिक माहिती अशी की, धनाजी पोवार हे आपली पत्नी सौ. श्वेता पोवार यांना कामावर सोडण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा या ठिकाणी गेले होते. त्यांना सोडून ते परत येत असताना दुपारी तीन वाजताच्या दरम्यान कांटे येथील थळ्याचा मळा येथील रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका वाळलेल्या झाडाची फांदी तुटून त्यांच्या अंगावर पडल्याने त्यांचा गाडीवरील ताबा सुटून गाडीवरून पडल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला होता. एक तासापेक्षा अधिक वेळ झाला तरी त्यांना कोणीही मदत केली नाही. परंतू सदर घटनेची माहिती करंजफेण येथील पुढारीचे पत्रकार संजय पोवार व कांटे येथील पोलिस पाटील जगदीश पाटील यांना या घटनेची मा...

आज मराठा सेवा संघ वाशिम नवीन कार्यालयात जिजाऊ रथयात्रा नियोजन पूर्वतयारी बैठक संपन्न.

Image
  आज मराठा सेवा संघ वाशिम नवीन कार्यालयात जिजाऊ रथयात्रा नियोजन पूर्वतयारी बैठक संपन्न. -------------------------   रिसोड प्रतिनिधी  रणजीत सिंह ठाकुर  -------------------------  दिनांक 18 ते 19 एप्रिल या दोन दिवसात जिजाऊ रथयात्रा वाशिम जिल्ह्यात येत असून हृदयात्रेच्या स्वागतासाठी स्थळ निश्चिती ,स्वागत स्थळ , सभास्थळ, सकाळचा नाश्ता व दुपारचे जेवण,रात्रीचा मुक्काम व जेवण, आदीबाबत चर्चा झाली व उद्यापासून मंगरूळपीर कारंजा रिसोड मालेगाव या ठिकाणी जिल्हा कार्यकारिणीचे प्रमुख पदाधिकारी बैठकीस उपस्थित राहतील तालुका पदाधिकाऱ्यांनी स्थळ निश्चित करून बैठकीचे आयोजन करावे त्यानंतर पुढील नियोजन करण्यात येईल.. सभेचे अध्यक्ष मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष नारायणराव काळबांडे व प्रमुख मार्गदर्शक म्हणून विभागीय अध्यक्ष अशोकराव महाले सर , प्रबोधन कक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा भारत आव्हाळे सर ,संभाजी ब्रिगेड विभागीय अध्यक्ष गजाननराव भोयर , प्रमुख उपस्थिती मध्ये , जिल्हा सचिव डॉक्टर विजय काळे,जिल्हाध्यक्ष गणेश सुर्वे,बुलढाणा जिल्हाध्यक्ष प्रा.योगेश्वर निकस, विभागीय कार्याध्यक्ष अनिल ...

डॉ.अनुराग वानखेडे एम.बी.बी.एस प्रथम श्रेणीत उत्तीर्ण , व आमदार किरणराव सरनाईक यांच्या हस्ते सत्कार.

Image
  डॉ.अनुराग वानखेडे एम.बी.बी.एस प्रथम श्रेणीत उत्तीर्ण , व आमदार किरणराव सरनाईक यांच्या हस्ते सत्कार. --------------------------------- रिसोड प्रतिनिधी  रणजीत सिंह  ठाकुर  --------------------------------- रिसोड तालुक्यातील केनवड येथील प्रतिष्ठित नागरिक श्री.सितारामजी वानखेडे (सेवानिवृत्त तलाठी)  व वाशीम  येथील स्वर्गीय अ‌ॅड.नामदेवरावजी  बाजड (सरकारी वकील) , यांचा नातू,प्राध्यापक विकास वानखेडे व अ‌ॅड.  रिता वानखेडे यांचा मुलगा डॉ. अनुराग विकास वानखेडे  हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,सायन,मुंबई येथून MBBS अंतिम वर्ष प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल केनवड पंचक्रोशीतील मंडळी तथा नातेवाईक यांनी त्यांचे अभिनंदन करून पूढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.या यशाचे श्रेय त्यांचे शाळेतील डॉ.वर्ग व तज्ञ मंडळी आणखी आई, वडील,आजोबा यांना जाते. या यशाबद्दल शिक्षक आमदार किरणराव नाईक यांनी डॉ. अनुराग वानखेडे यांचा सत्कार केला.

जल जिवन मिशन अंतर्गत कामाची चौकशी कराः- विजयराव पौळ माजी पंचायत समिती सदस्य.

Image
जल जिवन मिशन अंतर्गत कामाची चौकशी कराः- विजयराव पौळ माजी पंचायत समिती सदस्य. -------------------------  रिसोड प्रतिनिधी  रणजीत सिंह ठाकुर  -------------------------  रिसोड तालुक्यातील मांगवाडी येथील, जल जीवन मिशन अंतर्गत कामाची चौकशी करून, ग्रामस्थांना पाणीपुरवठा उपलब्ध करून द्यावा! अशी मागणी विजय पौळ माजी पंचायत समिती सदस्य यांनी केली आहे. सविस्तर वृत्त असे की, मांगवाडी येथील ग्राम मांगवाडी, तालुका रिसोड जिल्हा वाशिम येथील गावकऱ्यांनी मांगवाडी येथे अंदाजपत्रकानुसार  जल जीवन मिशन योजनेचे काम झाले नसल्याचे म्हटले आहे. कामाची मुदत ही माहे जुलै 2024 मध्ये संपली असून सदर काम करतेवेळी गावातील रस्ते फोडले असून त्यामुळे गावातील लोकांना येण्या जाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच जल जीवन मिशन अंतर्गत काम अर्धवट झाले असून सदर योजनेअंतर्गत आज पर्यंत गावात पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. असे या निवेदनावर आपली स्वाक्षरी करणारे मा. प.स. विजय पौळ, विनोद रामराव बाळके सरपंच, गजानन भिकाजी मोरे उपसरपंच, लता सिताराम वाळके सदस्य, विठ्ठल विष्णू कांबळे, पाटील समाधान, सखाराम वाळके, मा...

होसूर ट्रक दुर्घटनेतील आरोपीला अटक.

Image
  होसूर ट्रक दुर्घटनेतील आरोपीला अटक. -------------------------------- चंदगड प्रतिनिधी  आशिष पाटील  -------------------------------- कोवाड पोलिसांनी चोवीस तासात आरोपीला ठोकल्या बेड्या चंदगड (प्रतिनिधी) : ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचे दोन तुकडे होऊन दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना गुरुवारी (दि.२७) बेळगाव-कोवाड मार्गावर होसूरनजीक (ता.चंदगड) घडली होती.  यातील आरोपी ट्रक ड्रायव्हर फरार झाला होता. त्याला कोवाड पोलिसांनी चोवीस तासात पकडण्यात यश आले आहे. यातील ट्रक (नंबर KA 22 - D - 5540) तथा आरोपी ट्रक चालक आनंद शिवपुत्र दुगाइ (वय 34, रा. मनगुत्ती, ता. हूक्केरी, जि बेळगाव) हे उचगाव (ता.जि. बेळगाव) येथे असल्याचे समजले असता तेथे जावून त्याला अटक करण्यात आली आहे. घटनेचा तपशील असा की, गुरुवारी (दि.२७) सायंकाळी बेळगाव-कोवाड मार्गावर होसूरनजीक (ता.चंदगड) एका ट्रकने बेळगांवहून किणीकडे येणाऱ्या दुचाकीला जोरदार धाकड दिली. त्यामध्ये दुचाकीचे दोन तुकडे झाले आणि चालक फेकला जाऊन गंभीर जखमी झाला. दुचाकीवर मागे बसलेला यातून सुदैवाने बचावला. किसन मारुती साळुंखे (वय २२, रा.शिवनगे, ता.चंदगड...

पंचगंगा स्मशानभूमीतील दानपेटीत 1 लाख 61 हजार जमा.

Image
  पंचगंगा स्मशानभूमीतील दानपेटीत 1 लाख 61 हजार जमा. ---------------------------------- कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी शशिकांत कुंभार  ---------------------------------- कोल्हापूर ता.01 :- कोल्हापूर महानगरपालिकेच्या पंचगंगा, कसबा बावडा, कदमवाडी व बापट कॅम्प येथे स्मशानभुमी आहेत. याठिकाणी महापालिकेच्यावतीने मोफत अंत्यसंस्कार करण्यात येतात. पंचगंगा स्मशानभूमी व इतर ठिकाणी गुप्तदान पेटया ठेवण्यात आल्या आहेत. स्मशानभूमीत अंत्यसंस्कार आणि रक्षाविर्सजनासाठी येणारे नागरीक या दानपेटीत सढळ हाताने दान करतात. या गुप्तदान पेटया दरवर्षी मार्च अखेरीस उघडण्यात येतात. पंचगंगा स्मशानभूमी येथील गुप्तदान पेटी मंगळवारी मुख्य आरोग्य निरिक्षक डॉ.विजय पाटील, माजी नगरसेवक ईश्वर परमार, आरोग्य निरीक्षक (स्मशान) सुशांत कांबळे, सुरज घुणकीकर, लेखापाल विभागाचे राजु देवार्डेकर, विजय मिरजे, मुकादम व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत उघडण्यात आली. या दानपेटीमध्ये रु.1,61,537/- इतकी रक्कम जमा झालेली आहे. यापूर्वी माहे मार्च 2024 मध्ये स्मशानभूमीकडील दानपेटी उघडण्यात आल्या होत्या. यामध्ये पंचगंगा स्मशानभूमीकडे तब्बल रु.2 ला...

निधि कमी पडू देणार नाही - ना. अशोक उईके.

Image
  निधि कमी पडू देणार नाही - ना. अशोक उईके. ---------------------------------------  चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी  मंगेश तिखट ---------------------------------------  पालकमंत्री डॉ. अशोक उईके म्हणाले आदिवासी समाजाच्या लोककला आणि संस्कृतीचा व्यापक दृष्टिकोन ठेवून विशेष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. हा समाज देव, धर्म आणि संस्कृतीचे पालन करणारा आहे.कोरपना येथील लोककला आणि संस्कृतीचे दर्शन वाखाणण्याजोगे आहे. आदिवासी समाजाची समृद्ध आणि आदर्श संस्कृती आहे.चंद्रपूर जिल्ह्याचा पालकमंत्री आणि आदिवासी विकास विभागाचा मंत्री म्हणून या आदिवासीबहुल भागाला निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही, पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिली.

आदिवासी सांस्‍कृतिक महोत्‍सव. कोरपना तेथे संपन्न.

Image
आदिवासी सांस्‍कृतिक महोत्‍सव. कोरपना तेथे संपन्न. -----------------------------------  चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी  मंगेश तिखट ------------------------------------ राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आणि आदिवासी विकास विभागाच्या सहकार्याने काल दि. ३१ मार्च रोजी कोरपना येथे भव्य आदिवासी लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.  कोरपना शहरात पहिल्यांदाच झालेल्या या ऐतिहासिक अशा कार्यक्रमाला राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ना. ॲड. आशिषजी शेलार, राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. प्रा. डॉ. अशोक उईके आणि राज्याचे माजी मंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती होती.  माझ्या मतदार संघातील कोरपना तालुका हा आदिवासी बहुल आहे. या मतदारसंघात आदिवासी बांधवांच्या परंपरागत लोककलेला व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम महत्वपूर्ण ठरला. राजुरा विधानसभेतील सर्वाधिक पेसा ग्रामपंचायती असणाऱ्या कोरपना तालुक्याच्या विकासासाठी पालकमंत्री ना. अशोकजी उईके हे अग्रणी राहून सहकार्य करतील तर शहरात अत्याधुनिक सुविधायुक्त सांस्कृतिक सभागृह व नजिकच्या म...

दि. 1 एप्रिल 2025.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या निर्देशांमुळे.

Image
 दि. 1 एप्रिल 2025.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या निर्देशांमुळे. --------------------------------- कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी शशिकांत कुंभार  ---------------------------------- कोल्हापूरात ‘आयटीहब’ उभारण्याचा मार्ग मोकळा. *शेंडापार्कच्या ‘आयटीहब’ला कृषी विद्यापीठाची 34 हेक्टर जागा घेण्याच्या बदल्यात* *विद्यापीठाला देण्यासाठी शेतीयोग्य 60 ते 100 हेक्टर जागेचा शोध दहा दिवसात घ्या* *-- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश* *कृषी विद्यापीठाला शेतीयोग्य, सुविधायुक्त पर्यायी जागा देण्यासाठी* *कागल, पन्हाळा राधानगरी आणि हातकणंगले तालुक्यांना प्राधान्य* *--उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय* मुंबई, दि. 1 :- कोल्हापूरच्या शेंडापार्क येथे ‘आयटीहब’ उभारण्यासाठी कृषी विद्यापीठाची 34 हेक्टर जागा हस्तांतरीत करण्यात येणार असून कृषी विद्यापीठाला शेती, शिक्षण, संशोधन आदी कार्यासाठी पर्यायी जागा म्हणून कागल, पन्हाळा, हातकणंगले, राधानगरी तालुक्यातील 60 ते 100 हेक्टर एकत्रित जागेचा शोध घेण्यात यावा. येत्या दहा दिवसात कृषी विद्यापीठाच्या सहमतीने पर्यायी जागा अंति...

अक्षर मानव अमरावतीच्या जिल्हाध्यक्षपदी भारत मलवार यांची नियुक्ती.

Image
  अक्षर मानव अमरावतीच्या जिल्हाध्यक्षपदी भारत मलवार यांची नियुक्ती. --------------------------------  अमरावती जिल्हा प्रतिनिधी    गजानन जिरापुरे --------------------------------  तिवसा:- अक्षर मानव संघटनेच्या अमरावती जिल्हाध्यक्षपदी तिवस्याचे भारत मलवार यांची निवड करण्यात आली. आजपासुन ते जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी स्विकारतील. हि घोषणा अक्षर मानव महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण जावळे यांच्या परवानगीने संघटनेचे राज्य कार्यवाह तथा पालकमंत्री अक्षर मानव विदर्भ आझाद खान यांनी ही घोषणा केली. त्यांनी भारत मलवार यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अक्षर मानव जात, धर्म, पंथ, लिंग, भाषा, प्रदेश असे सारे भेद दुर करुन माणूस सजग,निर्मळ व्हावा यासाठी संघटना काम करते माणूस हा निव्वळ माणूस म्हणून जगू शकतो या साठी धडपडते साहित्य,समाज, आरोग्य, कला, शिक्षण,श्रम, विज्ञान, अश्या मानवी जीवन जगण्याच्या 70 विषयात संघटना काम करते. कुटुंब आणि समाजव्यवस्था दुरुस्त करणारी अक्षर मानव संघटना आहे. संपूर्ण महाराष्ट्रात माणसानं साठी काम करणारी एकमेव संघटना आहे. असे राज्य क...