शिवचरित्र हे देश देव आणि धर्म कार्य करण्यासाठी प्रेरणा स्तोत्र कानेरकर भवानी वेस येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव निमित्त व्याख्यान.

 शिवचरित्र हे देश देव आणि धर्म कार्य करण्यासाठी प्रेरणा स्तोत्र कानेरकर भवानी वेस येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव निमित्त व्याख्यान.

--------------------------------------

अमरावती जिल्हा प्रतिनिधी.

पी.एन. देशमुख.

--------------------------------------

छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र हे देश, देव आणि धर्म कार्य करण्यासाठी प्रेरणा स्तोत्र आहे.राष्ट्रीयत्वची भावना युवकांमध्ये निर्माण होण्याकरता शिवचरित्र व्याख्यान नियमितपणे आयोजित केले जावे असे प्रतिपादन शिवचरित्र व्याख्यान ते सोपान कानेरकर यांनी केले शतक पुर्ती झालेल्या, भवानी वेस्ट येथील हनुमान व्यायाम शाळेच्या शिवजयंती उत्सवानिमित्त आयोजित व्याख्यान प्रमुख वक्ते म्हणून कानेरकर बोलत होते यावेळी मंचावर विदर्भ प्रबोधन मंडळाचे कार्यकारणी अध्यक्ष रवींद्र गंदूरकर खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष प्रभाकर कोरपे मुख्याध्यापकरवींद्र गंदूरकर खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष प्रभाकर कोळपे मुख्याध्यापक परिमल नळकांडे नितीन काळे आदित्य गावंडे प्रवेश रवाळे संजय जोशी उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापुरे पंचायत समितीचे राजेंद्र चुटे आदी उपस्थित होते यावेळी दत्तात्रय इंगळे यांनी शिवकालीन राजमुद्रा प्रतीक श्री हनुमान व्यायाम शाळेला तसेच शिव व्याख्यान ते सोपान कानेरकर यांना अर्पण केले पुढे बोलताना सोपान कनेरकर म्हणालेयुवक व विध्यार्थी, हे देशाचे बलस्थान आहे.राष्ट निर्मिती साठी त्यांच्या भुमीका महत्वाचे आहे. योग्य आचार,आहार,व विचार विचारसह व्यक्ती निर्माण करण्याकरिता व्यसनमुक्ती आवश्यक आहे छत्रपती शिवरायांच्या जीवनातील आदर्श प्रत्येकाने आपल्या जीवनात उतरविल्यास नवा समाज घडवण्यास मदत होणार आहे राजमाता जिजाऊ यांनी दिलेल्या प्रेरणा प्रत्येक स्त्रीने आपल्या जीवनात अंगी करावी देव देश आणि धर्म यात्रीावरील आपल्या जीवनाचे मार्ग क्रमांक अखंड भारत घडवण्यास मदत करणार आहे प्रत्येकाने आपल्या जीवनात शाकाहारी राहण्याचा प्रयत्न करावा भारतीय संस्कृतीनुसार प्रत्येक स्त्रीने आचरण केल्यास अप्रिय घटना कमी होऊ शकतात अशीही ते म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या विचार प्रत्येक पिढीने वारसा म्हणून जपावा असे आव्हान देखील कानेरकर यांनी उपस्थित केले प्रास्ताविक शशांक देशपांडे यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक विजय इंगळे तर आभार अभय देशमुख यांनी माडले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंमल गहरवाल प्रतीक नाकट ऋषिकेश इंगळे गौरव देशमुख सौरभ देशमुख पवन काठोळे भूषण खंडारे सागर इंगळे श्रीराम कुटाफळे महेश वानखडे मयूर चव्हाण यांच्यासह श्री हनुमान व्यायाम शाळेच्या सदस्या व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले छत्रपती शिवरायांच्या मूर्तीने वेधून घेतले उपस्थितीचे लक्ष शिवजयंतीनिमित्तमूर्तीने वेधून घेतले उपस्थितीचे लक्ष शिवजयंती निमित्त आयोजित व्याख्यान करीता.भवानी वेस्ट येथे मंच उभारण्यात आला होता या मंचावर छत्रपती शिवाजी महाराजांची नूतन मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती याप्रसंगी उत्तम सजावट करण्यात आली होती श्री हनुमान व्यायाम शाळेचे बांधकाम पूर्ण झाले असून शिवकाली गड किल्ल्याचे दृश्य रूप या बांधकामाला देण्यात आले आहे या नूतन इमारतीचे उद्घाटन सुद्धा या कार्यक्रम कार्यक्रम करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.