देवमाणसा’च्या रुपातला नराधम; बायकांना जिवंत गाडून नारळाचं झाड लावायचा हा डॉक्टर.

 देवमाणसा’च्या रुपातला नराधम; बायकांना जिवंत गाडून नारळाचं झाड लावायचा हा डॉक्टर.

-----------------------------------------

 मिरज तालुका प्रतिनिधी

 राजू कदम 

-----------------------------------------

सातारा : डॉक्टरांना देवमाणूस म्हणतात. रुग्णांचा जीव वाचवण्याचे काम डॉक्टर करतात. त्यामुळं त्यांना देवाइतकंच महत्त्व दिलं जातंय. मात्र, महाराष्ट्रातील सातारा गावात डॉक्टराच्या वेषात नराधम फिरत होता. या नराधमाने सहा महिलांचे बळी घेतले. कित्येक वर्ष हा प्रकार सुरू होता. मात्र एक बाई बेपत्ता झाली अन् या हत्याकांडाचा उलगडा झाला.


सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात हा सगळा प्रकार घडला होता. धोम धरणाऱ्या परिसरात असलेला गावात एक डॉक्टर राहायचा. संपूर्ण गाव याला देवमाणूस म्हणायचा. डॉ संतोष पोळ हे अडीअडचणीला गावकऱ्यांच्या मदतीला जायचे. त्यामुळं डॉक्टरांचे स्थान गावकऱ्यांच्या नजरेत महान ठरले. डॉ. पोळ गावातील एक प्रतिष्ठीत माणूस म्हणून ओळखला जावू लागला. लोकांच्या नजरेत आदराचे स्थान मिळवले.

2003 ते 2013 या 10 वर्षात वाईच्या धोम परिसरातून 3 बायका आणि 1 पुरूष गायब झाले होते. एकाच पंचक्रोशीतून गायब झालेल्या या व्यक्तींचे काय झाले हे कळलेच नाही. पोलिसांनादेखील या व्यक्तींचे काय झाले हे शोधून काढता आले नाही. पोलिसांना याचे धागेदोरे जुळवतादेखील आले नाही. या चार जणांच्या बेपत्ता होण्याचे गूढ 2016 मध्ये जानेवारीत सलमा नावाची एक नर्स गायब झाली. तेव्हाही तिचा तपास लागला नाही. मात्र, 2016 मध्ये मंगला जेधे गायब झाल्या.

मंगला जेधे ही बस स्टँडवरुन गायब झाली. मंगला जेधे या अंगणवाडी सेविका होत्या. राजकीय वजन असल्यामुळं पोलिसांवर दबाव होता. पोलिसांनी कसून चौकशी सुरू केल्यानंतर जेधेंच्या कुटुंबियांकडे चौकशी केले तेव्हा डॉ. संतोष पोळ यांचे नाव समोर आले. पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा मंगला जेधे यांचा फोन सुरू असल्याचे कळले. पोलिसांनी फोन ट्रेस केला तेव्हा सीमकार्ड सापडलं ज्योती मांढरे हिच्याकडे. पोलिसांनी ज्योती मांढरेला ताब्यात घेतल्यानंतर तिचा कबुलीजबाब ऐकून पोलिसही हादरले.

ज्योती मांढरेच्या अटकेने मंगला जेधे यांच्या खुनाचा शोध लागला तसंच, बेपत्ता झालेल्या आणखी 5 जणांच्याही मृतांचा उलगडा लागला आहे. डॉ. संतोष पोळ उपचाराच्या निमित्ताने फार्महाऊसवर बोलवायचा आणि उपचाराच्या बहाण्याने भुलीचं इंजेक्शन द्यायचा. भुलीचे इंजेक्शन दिल्यावर माणसाचा मेंदू काम करायचा आणि शरीर लुळं पडायचं. त्या आधीच पोळ खणलेल्या खड्ड्यात जिवंतपणी गाडायचा आणि वर नारळाची झाडं लावायचा.


संतोष पोळच्या फार्म हाऊसवर 6 खड्डे खणलेले होते आणि नारळाच्या झाडाखाली खणल्यानंतर 6 सांगाडे सापडल. तिथेच पोलिसांना सातवा खड्डा खणलेला दिसला. हा सातवा खड्डा होता तो ज्योती मांढरेला. संतोष पोळला तिचाच खून करायचा होता पण त्याआधीच त्याचा डाव फसला आणि त्याचे कारनामे बाहेर आले. ज्योती मांढरेला ताब्यात घेतल्यानंतर लगेचच पोळ याने पोबारा केला पण पोलिसांनी त्याला मुंबईतून अटक केली.

पैशाच्या हव्यासापोटी संतोष पोळने हे खून केल्याची कबुली दिली. हत्येनंतर मृतांचे जबरदस्तीने दागिगे काढून घेत असे. हे दागिने सोनार मारवाडी व नातेवाईकांकडे दिले असल्याचे त्याने सांगितले. ज्योती मांढरे माफीची साक्षीदार झाली. मात्र संतोष पोळ प्रकरणाचा खटला न्यायालयात अद्यापही सुरू आहे.

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.