गवारेड्याच्या हल्ल्यात दोन जखमी
गवारेड्याच्या हल्ल्यात दोन जखमी.
------------------------------------
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
------------------------------------
राधानगरी तालक्यातील घोटवडे व करवीर तालुक्यातील परिते येथे गव्यांच्या कळपाने धुमाकूळ घातला असून दोघांना धडक मारल्याने दोघांमधील एकजन गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार
परिते ता.करवीर येथील पाटील नाळवा शेतात रविवारी दुपारी दोन वाजता
पाच ते सहा गव्यांचा कळपातील एका गव्याने
प्रतिक गणपती पाटील वय
२२ यास धडक मारल्याने त्याच्या पोटात व हातात शिंग घुसल्याने हा युवक गंभीर जखमी झाला आहे.
त्याला कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
तर साताप्पा कुंडलिक पाटील वय ५० यांना देखील गव्याने धडक दिल्याने त्यांना मुक्का मार लागला आहे. त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या गव्यांनी पाटील नाळवा नावाच्या शेतातील पिकांचे नुकसान केले आहे.
या गव्यांच्या कळपामुळे परिते येथील शेतकरी भयभीत झाले आहेत. तरी वनविभागाने या गव्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिते गावचे सरपंच मनोज पाटील यांनी केली आहे.
भोगावती कडून आलेले गवे घोटवडे येथील नाळवा नावाच्या शेतात शिरले गवे पाहण्यासाठी काही तरुण गेले होते.बराच वेळ ऊसात गवे दिसत नसल्याने झाडावर दोन तरुण खाली उतरण्याचा प्रयत्न करत होते दरम्यान एका गव्याने झाडाला जोरात धडक दिल्याने झाडावर चढलेला एक तरुण खाली पडला सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Comments
Post a Comment