कै. शामराव खंडेराव मोहिते विद्या मंदिर सांगवडे शाळेमध्ये नवीन उपक्रम साजरा झाला.
कै. शामराव खंडेराव मोहिते विद्या मंदिर सांगवडे शाळेमध्ये नवीन उपक्रम साजरा झाला.
---------------------------
हुपरी प्रतिनिधी
जितेंद्र जाधव
---------------------------
कै. शामराव खंडेराव मोहिते विद्या मंदिर सांगवडे या शाळेमध्ये एक नवीन उपक्रमाला सुरुवात केली शाळेमध्ये मुलांना पाठ्यपुस्तक सोडून दुसरे काहीतरी गोष्टीची पुस्तके थोर नेत्यांची पुस्तके प्राण्यांची पुस्तके कादंबऱ्या कविता वाचायला उपलब्ध नव्हते काही पालकांनी आपल्या मुलांचा वाढदिवस साध्या पद्धतीने करून वाढदिवसातील बचत झालेले पैसे एकत्र करून आज शाळेमध्ये 40 ते 50 पुस्तकांचे वाटप करण्यात आले
मुलांनी पाठ्यपुस्तकाचा अभ्यास झाल्यानंतर मोबाईल कडे जाऊ नये म्हणून त्यांना काहीतरी जनरल नॉलेज मिळावे म्हणून हा नवीन उपकरण राबवण्यात आला वाढदिवस झाल्यानंतर मुलांना 50 100 चॉकलेट देण्यापेक्षा पालकांनी एक पुस्तक जर दिले तर ते पुस्तक हजारो विद्यार्थी वाचतील त्यामुळे त्यांना नवीन प्रेरणा मिळेल त्यांची बुद्धी प्रज्वलित होईल गावातील काही कार्यकर्त्यांनी या योजनेला आजपासून सुरुवात केली आणि त्यांनी सर्वांना पण सांगितले की असंच शाळेसाठी प्रत्येकाने एक एक पुस्तक दिला तर काही दिवसात या मराठी शाळेमध्ये मोठ्यात मोठी लायब्ररी तयार होईल त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल शिक्षकानी त्या सर्व कार्यकर्त्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं सर्व शिक्षकांनी या कार्यकर्त्यांनी जे काही नवीन कार्य सुरू केले ते कार्य कौतुकास्पद आहे असे त्यांनी उद्गार काढले या कार्यक्रमाला मुख्याध्यापक खराडे सर जाधव सर पाटील सर गुरव सर गवळी सर पाटील मॅडम कुंभार मॅडम गवळी मॅडम दांडगे मॅडम ग्रामपंचायत सदस्य सनी काशींबरे ग्रामपंचायत सदस्य शितल भेंडवडे भाजप जिल्हा उपाध्यक्ष अंकुश चांदणे जितेंद्र जाधव शंकर चव्हाण विजय सुमारे वैभव सनदी गौतम चौगुले विजय जाधव सामाजिक कार्यकर्ते आणि शाळेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते शिक्षकांनी सर्वांचं आभार मानलेत
Comments
Post a Comment