शाहूपुरी पोलिसांनी केल तोतया पोलीसाला जेरबंद .
शाहूपुरी पोलिसांनी केल तोतया पोलीसाला जेरबंद .
________________________________
शशिकांत कुंभार
कोल्हापूर प्रतिनिधी : दोन दिवसांपूर्वी बालाजी पार्क मणेर माळ उचगाव येथील निलेश कोंडीबा सावंत यांना तोतया पोलीसाने लुटलं. दोन दिवसांपूर्वी सावंत हे कामानिमि त्त शाहूपुरी व्यापारी पेठ वामन गेस्ट हाऊस येथे आले असता त्यांना एका इसमाने पोलीस असल्याची बतावणी करून कोल्हापुरात तूम्ही रात्री उशिरा का फिरत आहात मार्च येडिंग मुळे लेट नाईट फिरणार्यांना १००० दंड लागत आहे. पैसे भरा नाहीतर तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये नेऊन तुमच्यावर गुन्हा दाखल करीन अशी भीती दाखवून निलेश सावंत यांच्याकाडून ६०० रुपये दंड वसुल केला. यापुढे तोतया पोलिसाने सावंत यांच्या पत्नीला फोनवरून धमकी देत सावंत यांच्याकडील वीस हजार रुपये किमतीचा मोबाईल संच हिसकावून घेतला होता. याप्रकरणी सावंत यांनी शाहूपुरी पोलिसात फिर्याद दाखल केली होती. सदर गुन्ह्या बाबत पोलीस निरीक्षक संतोष
डोके यांनी गुन्हे शोध पथकाला गुन्हा उघडीस अनन्या बाबत सूचना दिल्या होत्या. अज्ञाताचा पोलिसांनी या प्रकरणी (रा.पन्हाळा तालुक्यातील आवळी इथल्या महेश पाटील) याला सी. सी टीव्ही फुटेज च्या अधारे संशयित हा मार्केट यार्ड कोल्हापूर येथे येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी मार्केट यार्ड परिसरात सापळा रचून त्याला अटक केली.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील सहा. फौजदार संदीप जाधव, मिलिंद बांगर, सुशीलकुमार गायकवाड, सानिराज पाटील, रविकुम आर आंबेकर, विकास चौगुले, बाबा ढाकणे, आमोल पाटील, राहुल पाटील यांनी केली.
सदर आरोपीला मा न्यायालयात हजर केले असता न्यायालयानं त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावलीय असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शितल पालेकर या अधिक तपास करीत आहेत.
Comments
Post a Comment