मित्राच्या खून प्रकरणी तीन आरोपीस जन्मठेपेची शिक्षा, कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल.

 मित्राच्या खून प्रकरणी तीन आरोपीस जन्मठेपेची शिक्षा, कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल. 


मयत संतोष मोहन तडाके

----------------------------

जिल्हा सत्र न्यायालय प्रतिनिधी

अंकुश चांदणे 

-----------------------------

एस. एस. तांबे जिल्हा व सत्र न्यायाधीशसोो क.३, कोल्हापूर यांनी आज एका खुनाच्या गुन्ह्यात हा निकाल दिला आहे. या प्रकारणात सरकारी अभियोक्ताअॅड. मंजुषा पाटील यांनी काम पहिले.


सिद्धार्थ म्हेत्रे

सदर खुणाचा गुन्हा पोलीस ठाणे व गु.र.नं. शाहूवाडी पोलीस ठाणे गु.र.नं. ३२० / २०१९ रोजी नोंदवण्यात आला होता. 


अमीर मुल्ला


सुनील खोत

या मध्ये शिक्षा झालेले आरोपीचे पुढील प्रमाणे १. अमिर उर्फ कांचा आब्बास मुल्ला व व २७रा. गुरु कनान नगर, मठाजवळ, लिंबू चौक, इचलकरंजी २. संजय शरद शेडगे व व ३३ [मयत] ३. सुनिल बाळू खोत, व व ४८ दोघेही रा वरीलप्रमाणे ४.सिध्दराम उर्फ सिध्दार्थ शांताप्पा म्हेतर उर्फ म्हेतरी व व ३० रा. लिंबू चौक, तरंगे मळा, इचलकरंजी अशी आहेत. तर यातील फिर्यादी दत्तात्रय धोंडिबा गोमाडे, व व ५९, पोलिस पाटील रा. मानोली, ता. शाहूवाडी, जि कोलहापू हे आहेत. संतोष मोहन तडाके व व ३० ते ३५ रा. गुरु कनाननगर, इचलकरंजी.याचा निर्घृण खून करण्यात आला होता. २१/०९/२०१९ इ. रोजी १२.४९ वाजणेचे पूर्वी मानोली, ता. शाहूवाडी गावाचे हद्दीतील कोकण दर्शन पोइंटवर येथे खून करण्यात आला होता. 


तपासी अधिका-याचे भालचंद्र मा. देशमुख, तात्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक, शाहूवाडी पोलिस ठाणे, कोलहापूर, यांनी सम्पूर्ण तपास केला आहे.सदर गुन्ह्याची हकीकत अशी,सदरचा गुन्हा मा. कोर्टाच्या स्थळसीमेच्या हद्दीतील मानोली, ता. शाहूवाडी गावचे कोकण दर्शन पॉइंटवर दिनांक २१/०९/२०१९ रोजीचे १२.४९ वाजणेचे पूर्वी घडला आहे. यातील आरोपी क्र २, संजय शरद शेडगे व मयत संतोष मोहन तडाके हे दोघे नात्याने मावस भाऊ होते. यातील मयत हा आरोपी क्र २ याचे घरातील लोकांना व नातेवाइकांना वारंवार त्रास देत होता. या कारणावरुन आरोपी क २ याने आरोपी क १,३,४ यांना लिंबू चौक, इचलकरंजी येथे बोलावून घेवून विशाळगड येथे पार्टी करणेचे आहे असे सांगून आरोपी नं २ याने साक्षीदार राकेश युवराज जाधव याला फोन करुन त्याची इंडिका व्हीस्टा कार नंबर एम.एच.०९ डी.ए.०४४२ ही गाडी लिंबू चौक येथे आणून देणेस सांगून ती आरोपी क ३ याने चालवत नेउन मयतास सम्राट वाइन्स इचलकरंजी येथे दारु विकत घेवून हातकणंगले वाठार येथे येवून पुन्हा सीता वाईन्स येथून दारु विकत घेवून वारणानगर मार्गे मलकापूर येथे येवून तेथील अमगर पन्हाळकर याचेकडून चाईनीज राइस विकत घेवून आंबा मानोली मार्गे कोकण दर्शन पॉइंट येथे आणून मयतास बारु पाजून आरोपी क ४ याने त्याचे डोक्यात लोखंडी कोयत्याने गंभीर वार करुन आरोपी क २ याने त्याचेकडील चाकूने मयताचा गळा कापून खून करून मयत संतोष मोहन तडाके याचे प्रेताची विलहेवाट लावणेचे उद्देशाने व पुरावा नष्ट करणेचे उद्देशाने आरोपी नंबर १ ते ४ यांनी प्रेत कोकण दर्शन पॉइंट येथील दरीत टाकला व आरोपी क ४ याने लोखंडी कोयता व चाकू दरीत जोरात ताकदीने फेकून देवून रोडचे पलीकडे असलेलया लहान ओडयात हातपाय धुवून तेथेच जंगलातील झाडीत मयताचा नोकिया कंपनीचा मोबाईल टाकून देवून पुन्हा इंडिका व्हीस्टा कार गाडीतून परत इचलकरंजीकडे येताना वारुळ, ता. शाहूवाडी गावचे हदीतील कडवी नदीचे पात्रातील वाहत्या पाण्यात अंगातील रक्ताने माखलेले कपडे टाकून दिले. सदर भागातील गाईडचे काम करणारा दिनेशा आनंदा कांबळे याने प्रथम कोकण दर्शन पॉईंटच्या पेव्हींग ब्लॉक्सवर रक्त पडलेले पाहिले. त्याने त्याचा व्हीडिओ करुन तो त्याच्या मित्राला पाठविला. प्रमोद यशवंत माळी याने सदरचा व्हीडिओ फिर्यादी गोमाडे यांना पाठविला. पोलिस पाटील गोमाडे यांनी शाहूवाडी पोलिसांना कळवून पोलिसांसह घटना स्थळाचा शोध घेतला असता तेथे मयत संतोष तडाके याचा मृतदेह गळां कापलेलया व डोक्यामध्ये जखमा झालेलया अवस्थेत मिळून आला. तद्नंतर पोलिस पाटील गोमाडे यांनी शाहूवाडी, पोलीस ठाणे येथे सदर बाबत फिर्याद नोंदविली. तपासा दरम्यान आरोपीचा मयत संतोष याच्या खूनामध्ये सहभाग असलेचे पुराव्यानुसार निष्पन्न झालेने चारही आरोपींविरुध्द शाहूवाडी पोलिस स्टेशन येथे गु र नं.३२०/२०१९ नुसार भारतीय दंड संहिता कलम ३०२, २०१,३४ प्रमाणे गुन्हा नोंद करणेत आला होता.


या प्रकरणी सरकारी वकिल मंजुषा बी. पाटील यांनी एकुण सतरा साक्षीदार तपासले. सदर प्रकारणाचे चौकशीचे कामकाज सुरु असताना आरोपी नं १ संजय शेडगे हा मयत झाला, त्यामुळे उर्वरित तीन आरोपींविरुध्द चौकशशीचे कामकाज झाले. या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार कोणीही नव्हता. शेवट आरोपींबरोबर एकत्र पाहिले बाबतचा पुरावा, आरोपीने गुन्हा कबूल केलेचा पुरावा, आरोपींकडून जप्त करण्यात आलेलया गुन्हयात वापरलेलया वस्तुंचा पंचनामा, घटनास्थळ पंचनामा इत्यादीचे आधारे सरकार पक्षातर्फे केस मांडणेत आली. या कामी अमिर पन्हाळकर, रंगराव भोसले, संजय कांबळे, आरती पडळकर, तुषार नलवडे | नोडल ऑफिसर] यांच्या साक्षी अत्यंत महत्वपुर्ण ठरलया. या सर्वाच्या झालेल्या साक्षी व सरकारी वकिल मंजुषा बी. पाटील यांनी केलेला युक्तीवाद व मा. सर्वोच्च व मा. उच्च न्यायालयाचे न्याय निवाडे ग्राहय धरुन मा. न्यायालयाने खालील प्रमाणे शिक्षा ठोठावली.


आरोपी नं १, ३ व ४ यांना भादवि स कलम ३०२ नुसार जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी रक्कम रु. १०,०००/- दंड व दंड न भरलेस तीन महिने सक्त मजुरी अशी शिक्षा ठोठावली.


तसेच आरोपी नं. १, ३ व ४ यांस भादवि स कलम २०१ नुसार तीन वर्षे सक्त मजूरी व प्रत्येकी रु. १०,०००/- दंडाची शिक्षा ठोठावली.


सदर प्रकरणाचा तपास भालचंद्र मा. देशमुख, तात्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक, शाहूवाडी पोलिस ठाणे, कोलहापूर यांनी केला. तसेच कोर्ट पैरवी अधिकारी महिला पोलिस कॉन्स्टेबल सीमा अष्टेकर, ब नं.२२३८ शाहूवाडी पोलिस ठाणे, कोलहापूर यांनी कामकाजावेळी मदत केली.

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.