शहीद जवान सुनिल विठ्ठल गुजर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
शहीद जवान सुनिल विठ्ठल गुजर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
---------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
---------------------------
शित्तूर तर्फ मलकापूर (ता.शाहूवाडी) गावचे सुपुत्र शहीद जवान सुनिल विठ्ठल गुजर मणिपुर येथे कर्तव्य बजावत असताना त्यांना वीर मरण आले. शित्तूर तर्फ मलकापूर या त्यांच्या मूळ गावी शहीद जवान सुनिल विठ्ठल गुजर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
*शहीद जवान सुनिल विठ्ठल गुजर यांच्या पार्थिवास आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी पुष्पचक्र अपर्ण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.शहीद जवान सुनिल यांच्या कुटुंबियांसह शित्तूर तर्फ मलकापूर गावाचा संपूर्ण भारत देशाला अभिमान आहे.आहे गौरव उद्गार उपस्थित मान्यवरानी काढले. विनोद शिंगे कुंभोज
Comments
Post a Comment