नारंडा गावातील स्मशान भूमी चे लोखंडी शेड विक्री केल्याबाबत गावकऱ्यांनी केली तक्रार.
नारंडा गावातील स्मशान भूमी चे लोखंडी शेड विक्री केल्याबाबत गावकऱ्यांनी केली तक्रार.
---------------------------------------
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
मंगेश तिखट
---------------------------------------
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील नारंडा गाव येथील जुनी स्मशानभूमी होती. त्या स्मशान भूमी बाबत कोणताही निर्णय कोणत्याही वस्तूची विल्हेवाट लावायची असेल तर वरिष्ठ कार्यालय यांची परवानगी घेणे आवश्यक असल्याने किंवा निर्लेखन करण्याच्या प्रस्ताव करताना वरिष्ठ कार्यालयास पाठवणे बंधनकारक आहे. परंतु असे न करता ग्रामपंचायत सरपंच व सचिव या दोघांनी संगम मत करून सदर शेड पूर्ण विकून टाकले अशी तक्रार ना रंडा येथील गावकऱ्यांनी केली आहे
सदर माहिती बाबत सचिव यांना दूरध्वनी द्वारे तक्रार नागरिकांनी संपर्क केला असता मला याबाबत काहीच माहित नाही. नसल्याचे सांगण्यात आले आहे परंतु ग्रामपंचायत चा सचिव या नात्याने याबाबत माहीत असणे आवश्यक होते परंतु संबंधित सचिव यांना माहिती नाही हे खूप खेद जनक बाबत आहे यावरून असे लक्षात येते की ग्रामपंचायत नारंडा येथील सरपंच हे सचिव यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करीत आहे असावे की काय असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे
नारंडा स्मशानभूमी येथील लोखंडी शेडला सरपंच मुलगा आशिष ताजने यांनी गावातील रवींद्र आगलावे विनोद काथवटे दोन मजुरांना सांगून ते शेड कापून पिकप वाहन क्रमांक MH03CV6212 या वाहनात भरून देण्यात आले सदर चंद्रपूरला विक्रीसाठी नेल्यास माहिती मिळाली आहे.
करिता संबंधित दोषी वर खडक कारवाई करून फौजी दारी गुन्हा आपल्या मार्फतीने सादर करावा अन्यथा नारंडा येथील नागरिक पंचायत समोर या आंदोलन करणार असल्याची माहिती मिळाली आहे सदर चौकशी करून या दोषीवर कारवाई करून गावातील जनतेला न्याय द्या असे गावकरी आपले मत सादर केले आहे
Comments
Post a Comment