रखरखत्या उन्हात निराधार धडकले तहसील कचेरीवर

 रखरखत्या उन्हात निराधार धडकले तहसील कचेरीवर

------------------------------------------------

 *मंगेश तिखट* चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी 

-------------------------------------------------

कोरपना - तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेंतर्गत लाभार्थ्यांना लाभ मिळण्यात अडचणी येत असल्याने राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने नेतृत्वाखाली कोरपना तहसील कार्यालयावर धडक देण्यात आली. यावेळी तहसीलदारांना निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.

 

          अनेक गरजू निराधारांना अद्यापही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळालेला नाही. शासनाने योजना सुरू केली असली तरी अंमलबजावणीत अनेक अडथळे येत आहेत.

पात्र लाभार्थ्यांना तातडीने संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळावा.नव्याने अर्ज करणाऱ्या गरजू व्यक्तींना वेळीच मंजुरी द्यावी.

कोरपना तालुक्यातील लाभार्थ्यांची स्वतंत्र यादी तयार करून त्यांचा लाभ निश्चित करावा. दूरच्या अंतरावरील गावात विशेष कॅम्पचे आयोजन करावे

दर महिन्याच्या तारखेला लाभार्थ्यांना ठरलेल्या दिवशी मदत मिळावी. दरवर्षी मागण्यात येणाऱ्या उत्पन्नाच्या दाखल्याची अट रद्द करावी,

२०२४ - २०२५ मध्ये मंजूर झालेल्या हयात प्रमाणपत्र देऊन ही काही प्रकरणांमध्ये मदत अद्याप मिळालेली नाही, ती त्वरित मिळावी. तसेच अनेक संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्याचे वय हे 65 वर्षापेक्षा जास्त असून परंतु आधार कार्ड मध्ये त्यांचे वय कमी आहे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांकडे जन्माचा दाखला किंवा टीसी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना आधार कार्ड दुरुस्ती मध्ये अडचणी निर्माण होत आहे तरी वैद्यकीय अधिकारी यांच्या प्रमाणपत्रावर त्यांना आधार कार्ड मध्ये वयाची दुरुस्ती करणे संदर्भात परवानगी देण्यात यावी. हयात दाखला हा ऑनलाइन काढण्याची सक्ती केली असल्यामुळे अनेक निराधार लाभार्थ्यांचे अंगठे येत नसल्यामुळे त्यांचा ऑफलाइन हयातीचा दाखला स्वीकारण्यासंदर्भात मागणी करण्यात आली.

या योजनेबाबत माहिती मिळण्यासाठी स्वतंत्र मार्गदर्शन केंद्र सुरू करावे.आदी मागण्या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आल्या.

   तसेच ज्या संजय गांधी निराधार योजनेचा लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र अद्यापही तहसील कार्यालय येथे सादर केले नसतील, त्यांनी तात्काळ आपले हयात प्रमाणपत्र तहसील कार्यालय कोरपनामध्ये सादर करावे, असे आवाहन संजय गांधी निराधार विभागातर्फे करण्यात आले.

      यावेळी मोठ्या संख्येने कोरपना तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.