लाखोंच्या मोटार सायकली चोरणाऱ्या पाच चोरट्यांच्या करवीर पोलिसांनी आवळल्या मुसक्या.

 लाखोंच्या मोटार सायकली चोरणाऱ्या पाच चोरट्यांच्या करवीर पोलिसांनी आवळल्या मुसक्या.

----------------------------------

कोल्हापूर प्रतिनिधी

 शशिकांत कुंभार.

----------------------------------

 (कोल्हापूर ):- करवीर पोलिसांनी मोटारसायकल चोराच्या मुसक्या आवळत लाखोच्या मोटारसायकल हस्तगत करीत पाच चोरांना अटक केली  


करवीर पोलीस ठाणे, गुन्हे शोध पथकाकडुन चोरीच्या यामाहा RX-१००, KTM Duke, सुझुकी, टीव्हीएस MAX - १०० कंपनीच्या १५ मोटरसायकली व गुन्ह्यात वापरलेल्या ३ मोटरसायकली


अशा एकुण ०७,००,०००/- रुपये किंमतीच्या एकुण १८ मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. 


पोलीस ठाणे करवीर पोलीस ठाणे

यातील गुन्हा रजि. नं व कलम फिर्यादी नांव व पत्ता गुन्हा रजि. नं. १६०/२०२५ रितेश नामदेव कोळी, रा.यांनी फिर्यादी दिल्या प्रमाणे भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२), ३ (५) प्रमाणे चिंचवाड, ता. करवीर, कोल्हापूर दाखल होती. गु. घडला ता व वेळ दि. १८/०२/२०२५ रोजी २२.०० वा ते दि.१९/०२/२०२५ रोजी ०४.०० वा चे सुमारास केलीं फाटा, केलीं, ता. करवीर कोल्हापूर येथे त्या नुसार जप्त मुद्देमाल असा १) KTM Duke २०० मोटरसायकल ०३२ जप्त मुद्देमाल यामाहा RX-१०० मोटरसायकल ०९,३) यामाहा RX १३५ मोटरसायकल ०१ सुझुकी मोटरसायकल ०२, ५) युनिकॉर्न मोटरसायकल - ०१, ६) टीव्हीएस MAX १०० मोटरसायकल- ०१, ७) सुझुकी अॅक्सेस मोपेड -०१,एकुण १८ मोटरसायकली असा एकुण ०७,००,०००/- रुपयाचा माल जप्त करण्यात आल्या आहेत.

सदर कारवाई करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार मा. पोलीस अधीक्षक, श्री महेंद्र पंडीत सोो मा. अपर पोलीस अधीक्षक, धीरजकुमार बच्चू सो मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री सुजितकुमार क्षीरसागर सोो यांचे मार्गदर्शनाखाली, मा. पोलीस निरीक्षक श्री. किशोर शिंदे, सपोनि बाबासाहेब सरवदे, पोसई नाथा गळवे, विजय तळसकर, सुभाष सरवडेकर, रणजीत पाटील, सुजय दावणे, पो. कॉ अमोल चव्हाण, प्रकाश कांबळे, योगेश शिंदे, श्रीधर जाधव, विजय पाटील, रोहन वाकरेकर, चालक रणजित देसाई, मुरलीधर लांघी यांनी केली आहे.


यातील आरोपी पुढील प्रमाणे निष्पन्न आरोपीचे नांव व पत्ता, १) संकेत संदिप गायकवाड, वय १९, रा. दसरा चौक, वाडकर गल्ली, मौजे सागांव, ता कागल, जि. कोल्हापूर,२) आदित्य प्रकाश पाटील, वय २०, रा मगदुम मळा, मौजे सागांव, ता कागल, जि. कोल्हापूर, ३) सौरभ धनाजी पाटील, वय २२, रा. शिवाजी नगर, मौजे सागांव, ता कागल, जि. कोल्हापूर, ४) यश प्रकाश जाधव, वय २२, रा. बसस्टॅण्डजवळ, लबाजे गल्ली, कसबा सागांव, ता कागल, जि. कोल्हापूर, ५) सुमित धनाजी माळी, वय २१, रा. दत्त मंदिराजवळ, मौजे सागांव, ता कागल, जि. कोल्हापूर, ६) विधीसंषर्षग्रस्त बालक असे आहेत. तर यांच्या कडून उघडकीस आलेले मोटरसायकलचे गुन्हे,१) करवीर पोलीस ठाणे गुरनं १६०/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) प्रमाणे २) इस्युलीं पोलीस ठाणे गुरनं. २७/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) प्रमाणे, ३) शिवाजीनगर पोलीस ठाणे गुरनं. १६३/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) प्रमाणे, ४) इचलकरंजी पोलीस ठाणे गुरनं. ८९/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) प्रमाणे,५) राजारामपुरी पोलीस ठाणे - गुरनं. १३४/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) प्रमाणे, ६) राधानगरी पोलीस ठाणे - गुरनं. ७७/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) प्रमाणे, यातील फिर्यादी हे दि. १९/०२/२०२५ रोजी शिवजयंती निमीत्त ज्योत आणणेकरीता पन्हाळा जाताना त्यांनी त्याची यामाहा RX - 100 मोटरसायकल नं. MP-09-JC-2928 ही केलीं फाटा येथे लावुन ते पायी चालत गेले होते ते ज्योत घेऊन परत केलीं फाटा येथे आले तेव्हा तेथे त्याची यामाहा RX 100 मोटरसायकल मिळुन आली नाही म्हणुन यातील फिर्यादी यांनी करवीर पोलीस ठाणेस गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्हयाचा तपास चालु असताना काल दि. १९/०३/२०२५ रोजी गोपणीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, संकेत गायकवाड, रा कसबा सांगाव या इसम त्याचे मित्रासह चोरीची मोटरसायकल विक्री करणेकरीता मोरेवाडी येथील चित्रनगरीच्या माळावर येणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली त्याप्रमाणे मा. पोलीस निरीक्षक सोो किशोर शिंदे यांना सदर बातमीचा आशय कळवुन त्याचे मुखशील आदेशान्वये पोसई गळवे व करवीर गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार असे चित्रनगरी, मोरेवाडी सापळा लावुन आरोपी क्र. १ ते ५ यांचेकडे असलेल्या मोटरसायकल याना पुढे व मागे नंबरप्लेट नसल्याने त्यांना त्याचे नंबरबाबत विचारणा केली असता त्यांना मोटरसायकलचे नंबर सांगता आले नाही तसेच त्यांना मोटरसायकलच्या कागदपत्राबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची


उत्तरे देऊ लागले म्हणून त्याना विश्वासात घेऊन त्याचेकडे विचारपुस केली असता त्यांनी सांगितले की, सदरच्या मोटरसायकली ह्या चोरीच्या आहेत. त्याचे कब्जात मिळालेली चेरी रंगाची यामाहा RX 100 व दोन KTM Duke 200 मोटरसायकली ह्या अनुक्रमे केलीं फाटा, शाहुमिल, कोल्हापूर व आमराई मळा, इचलकरंजी येथुन चोरी केलेबाबत सांगितले त्याबाबत करवीर, राजारामपुरी व इचलकरंजी पोलीस ठाणेस गुन्हे दाखल असल्याची खात्री केली. यातील इचलकरंजी पोलीस ठाणेकडील KTM Duke 200 मोटरसायकल ही अ.क्र. ५ व ६ यांनी चोरी केली असल्याने यातील अ.क्र. ५ यास इचलकरंजी पोलीस ठाणे रिपोर्टासह हजर केले आहे. यातील अ.क्र. १ ते ४ यांना करवीर पोलीस ठाणेकडील वर नमुद गुन्हयात अटक करुन त्याचेकडे अधिक तपास केला असता त्याचेकडुन १२ मोटरसायकली त्यात यामाहा RX 100 मोटरसायकल, TVS MAX 100 व सुझुकीच्या मोटरसायकली त्याचेकडुन जप्त करणेत आलेल्या आहेत. यातील आरोपी यांचेकडुन जिल्हयातील राजारामुपरी, इस्युली, शिवाजीनगर, इचलकरंजी, राधानगरी या पोलीस ठाणेकडील मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत. यातील आरोपी १ ते ६ हे एकाच गांवातील राहणारे असून ते एकमेकांचे चांगले मित्र आहेत. तसेच त्याचा यामाहा रेसिंग क्लब नावाचा ग्रुप आहे. सदर आरोपी यांना मोटरसायकल


रेसिंगची आवड असल्याने त्यांनी यामाहा मोटरसायकलसह हौसेसाठी इतर मोटरसायकली चोरी केल्या आहेत. यातील आरोपी १ ते ४ यांना मा कोर्टात हजर केले असता त्यांना ०१ दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मंजुर करणेत आलेली आहे. यातील आरोपी यांनी आणखीन यामाहा मोटरसायकली चोरी केले असण्याची शक्यता असल्याने त्यादृष्टीने तपास अधीक करीत आहोत.

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.