सांगली फाटा येथे ९ किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कामगिरी.
सांगली फाटा येथे ९ किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कामगिरी.
---------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
शिरोली प्रतिनिधी
अमित खांडेकर
---------------------------
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर कडील पोलीस पथक तयार करुन अवैध गांजाची वाहतूक, विक्री करणारे इसमांवर कारवाई करणेसाठी माहिती घेत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार सागर चौगले यांना गोपनीय बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील सांगली फाटा येथे एक इसम गांजा हा अंमली पदार्थ विक्री करीता घेवून जाणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली. त्या बातमीचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक श्री. चेतन मसुटगे, पोलीस उपनिरीक्षक श्री. जालींदर जाधव व पोलीस अंमलदारांचे पथक यांचेसह सदर ठिकाणी जाऊन खात्री करून सापळा लावुन दि. 22/03/2025 रोजी छापा टाकला असता आरोपी इसम नामे सत्यजीत सदाशिव जाधव वय 34, रा. २२ / १४१४ जाधव बोअरवेल्स, विकासनगर, इचलकरंजी, कोल्हापूर सध्या रा.रत्नागिरी याचे ताब्यात गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला. बेकायदेशिर विक्रीकरिता घेवून निघालेला एकूण 9 किलो 78 ग्रॅम वजनाचा गांजा व इतर साहित्य असा एकूण 2,38,450 /- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करणेत आला आहे. आरोपी सत्यजीत जाधव यास विश्वासात घेवून तपास केला असता त्याने सदरचा गांजा हा रत्नागिरी येथे विक्रीकरीता घेऊन जाणार असलेचे कबूली दिली आहे. आरोपी विरुध्द शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणेस एनडीपीएस कायदया अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हयाचा पुढील तपास शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक, श्री. महेंद्र पंडित सो, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. निकेश खाटमोडे-पाटील, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री. डी. धीरजकुमार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, पोलीस उप निरीक्षक जालींदर जाधव तसेच पोलीस अंमलदार सागर चौगले, अशोक पोवार, प्रशांत कांबळे, रामचंद्र कोळी, महेश आंबी, प्रदिप पाटील, अनिकेत मोरे, अमित सर्जे, कृष्णात पिंगळे, महेश पाटील, सुशील पाटील, महादेव गुरव व महिला पोलीस अंमलदार सायली कुलकर्णी यांचे पथकाने केलेली आहे.
Comments
Post a Comment