कोल्हापूर परिमंडलात 34 कोटी 59 लाखांची वीजबिल थकबाकी.

 कोल्हापूर परिमंडलात 34 कोटी 59 लाखांची वीजबिल थकबाकी.

9 हजार 458 ग्राहकांचा वीज पुरवठा केला खंडित.

मार्च अखेर प्रत्येक दिवशी 6 कोटी 92 लाख वसुलीचे आव्हान.


*ग्राहकांनी वीजबिल भरून सहकार्य करावे – महावितरण*


*कोल्हापूर/सांगली, दि. 26 मार्च 2025:* विजेचा वापर केल्यानंतरही बिलांचा मासिक भरणा नियमित होत नसल्याने कोल्हापूर परिमंडल अंतर्गत प्रामुख्याने घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, सार्वजनिक सेवा व इतर वर्गवारीतील 71 हजार 281 ग्राहकांकडे 34 कोटी 59 लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. तर गेल्या तीन महिन्यांत परिमंडल अंतर्गत 3 हजार 537 ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरुपात खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे थकबाकीदार वीजग्राहकांनी बिलांचा भरणा देय दिनांकापूर्वी करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.


यामध्ये कोल्हापूर परिमंडल अंतर्गत येणाऱ्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील घरगुती 54 हजार 292 ग्राहकांकडे 6 कोटी 67 लाख, व्यावसायिक 6 हजार 406 ग्राहकांकडे 2 कोटी 47 लाख, औद्योगिक 7 हजार 194 ग्राहकांकडे 22 कोटी 19 लाख, सार्वजनिक सेवा 2 हजार 992 ग्राहकांकडे 2 कोटी 58 लाख आणि इतर वर्गवारीतील 397 ग्राहकांकडे 68 लाख रुपयांच्या वीजबिलांची थकबाकी आहे. 


घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, सार्वजनिक सेवा व इतर वर्गवारीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर शहर विभागात एकूण 3 हजार 641 ग्राहकांकडे 01 कोटी 71 लाख, कोल्हापूर ग्रामीण-1 विभागात 3 हजार 770 ग्राहकांकडे 70 लाख, कोल्हापूर ग्रामीण-2 विभागात 4 हजार 80 ग्राहकांकडे 08 कोटी 71 लाख, जयसिंगपूर विभागात 4 हजार 445 ग्राहकांकडे 01 कोटी 88 लाख, इचलकरंजी विभागात 07 हजार 797 ग्राहकांकडे 06 कोटी 09 लाख व गडहिंग्लज विभागात 1 हजार 523 ग्राहकांकडे 57 लाख रुपयांची थकबाकी आहे.


तर सांगली जिल्ह्यातील सांगली शहर विभागात 10 हजार 133 ग्राहकांकडे 03 कोटी 61 लाख, सांगली ग्रामीण विभागात 6 हजार 515 ग्राहकांकडे 01 कोटी 42 लाख, इस्लामपूर विभागात 10 हजार 786 ग्राहकांकडे 05 कोटी 01 लाख, कवठेमहांकाळ विभागात 8 हजार 970 ग्राहकांकडे 02 कोटी 16 लाख व विटा विभागात 9 हजार 621 ग्राहकांकडे 02 कोटी 72 लाख रुपयांची थकबाकी आहे. या थकीत बिलांचा त्वरित भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.


 थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी (दि.29), रविवारी (दि.30) व सोमवार (दि.31) रोजी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत.


वीजग्राहकांना www.mahadiscom.in या वेबसाईटवर तसेच महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे केव्हाही व कुठूनही ऑनलाइन पध्दतीने विनामर्यादा वीजबिलाचा भरणा करता येतो. ग्राहकांना देय रक्कमेवर 0.25 टक्के डिजिटल वीज बिल भरणा सूट दिली जाते. या व्यतिरिक्त महावितरणने 5 हजार रुपयांपेक्षा अधिक बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे देयक भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासाठी आवश्यक माहितीचा तपशील संबंधित ग्राहकांच्या वीजबिलावर उपलब्ध आहे. 


*सोबत – मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांचा व्हिडीओ*

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.