लक्ष्मीपुरीतील दत्त ट्रेडर्स या दुकानदाराकडून सातशे किलो प्लास्टिक जप्त .

लक्ष्मीपुरीतील दत्त ट्रेडर्स या दुकानदाराकडून सातशे किलो प्लास्टिक जप्त . कोल्हापूर ता.29 : महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने शहरात एकल वापर प्लॅस्टिक बंदी मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. प्रशासक के.मंजूलक्ष्मी व अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज लक्ष्मीपूरी येथे हि मोहीम राबविण्यात आली. दुपारी या मोहिमेअंतर्गत सहा.आयुक्त कृष्णा पाटील यांनी पथकांमार्फत लक्ष्मीपूरी परिसरात एकल वापर प्लॅस्टिकची तपासणी केली. यावेळी लक्ष्मीपूरी येथील दत्त ट्रेडर्स दुकानदाराकडे 700 किलो सिंगल यूज प्लॅस्टिक आढळून आले. सदरचे प्लॅस्टीक जप्त करण्यात आले असून बाजूचे इतर प्लास्टिक विक्रेते दुकानदार पळून गेल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई करता आली नाही. पण 8 ते 10 दिवसात शंभर टक्के कारवाई करण्यात येणार आहे. सदरची कारवाई विभागीय आरोग्य निरीक्षक नंदकुमार पाटील, आरोग्य निरीक्षक शुभांगी पवार, सहाय्यक आरोग्य निरीक्षक नंदकुमार कांबळे, मुकादम व कर्मचाऱ्यांनी केली.