नरंदे यात्रेतील कुस्ती मैदान थांबल्याने कुस्ती शौकिनांच्यात नाराजी.
नरंदे यात्रेतील कुस्ती मैदान थांबल्याने कुस्ती शौकिनांच्यात नाराजी.
------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
------------------------
नरंदे तालुका हातकलंगले येथे नागनाथ देवाच्या यात्रेनिमित्त गेल्या पन्नास वर्षापेक्षा जास्त वर्षाची परंपरा असणारी कुस्तीचे मैदान यावेळी का थांबले असून त्यामुळे कुस्ती शौकिनांच्यातून नाराजी व्यक्त होत आहे. परिणामी नरंदे गावचे लोकनेते कै सिताराम बापू भंडारी यांनी कुस्ती परंपरेला सुरुवात केली व त्या कुस्ती परंपरेची सुरुवात म्हणून नरंदे गावचे ग्रामदैवत नागनाथ देवाच्या यात्रेनिमित्त केल्या पन्नास वर्षापासून जास्त कालावधीत नरंदे येथे यात्रेच्या तिसऱ्या दिवशी भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन केले जात होते. सदर कुस्ती मैदानमध्ये महाराष्ट्रातील नामवंत मल्लाचा सहभाग कुस्तीसाठी असायचा लोकनेते सिताराम बापू भंडारी यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव पैलवान बबन भंडारी यांनी सदर कुस्तीची परंपरा अबाधित ठेवली व त्यांनी ती अनेक वर्ष चालू ठेवली सदर नरंदे कुस्तीच्या मैदानातून अनेक मल्ल सध्या महाराष्ट्रात कार्यरत असून त्यापैकीच एक म्हणजे नरंदे गावचे सुपुत्र व शरद सहकारी सहकार करण्याचे संचालक पैलवान अभिजीत भंडारी यांनी आपले वडील शरद कारखान्याचे संचालक कैलासवासी बबन भंडारी व नरंदे ग्रामस्थ व यात्रा कमिटीच्या माध्यमातून अनेक वर्ष कुस्तीची परंपरा आबादीत ठेवली परिणामी यावर्षी मात्र नरंदे येथे कुस्तीचे मैदान नसल्याने कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील अनेक कुस्ती शौकीन व मल्लांची नाराजी झाल्याचे चित्र दिसत असून, गेल्या अनेक वर्षानंतर यावर्षी नरंदे यात्रेत कुस्तीचे मैदान नसल्याने कुस्ती शौकिनांच्यातून नाराजी पसरली आहे.
परिणामी यामुळे कुठेतरी हातकणंगले तालुक्यात कुस्तीची परंपरा ज्या नरंदे गावाने कायम अबाधित ठेवले ती परंपरा का खंडित पडत आहे याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात होत असून कैलासवाशी सिताराम बापू भंडारी व कैलासवासी बबन भंडारी यांनी कुस्तीच्या माध्यमातून पैलवान तयार करण्याचे स्वप्न पाहिले होते व ते स्वप्न सध्या का दुर्लक्षित होत आहे याची चर्चा ग्रामस्थातून रंगत असून, पुन्हा एकदा नरंदेचे कुस्ती मैदान चालू झाल्यास कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील कुस्ती खेळणाऱ्या खेळाडूंना चांगले प्रोत्साहन मिळेल. त्यासाठी पुन्हा एकदा नरंदे कुस्ती मैदानाचे आयोजन करावे अशी मागणी कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील नावाजलेल्या पैलवान तालमीतून होत आहे. नंरदे येथे कुस्ती मैदानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील नावाजलेले अनेक महाराष्ट्र केसरी व हिंदकेसरी यांनी उपस्थिती दाखवून सदर मैदानाचे अनेक वेळा उद्घाटन केले आहे .त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील आजी-माजी आमदार खासदार व मंत्री महोदय सदर कुस्तीसाठी उपस्थित राहून सदर कुस्ती मैदानाला आपले प्रोस्ताहन देत होते. परंतु या वर्षी मात्र नरंदे येथे कुस्ती मैदानाचे आयोजनच नसल्याने अनेक कुस्ती शौकीनांची नाराजी झाल्याचे चित्र दिसत आहे.विनोद शिंगे कुंभोज
Comments
Post a Comment