छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार अमेरिकेच्या भूमीत .
छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार अमेरिकेच्या भूमीत .
------------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
-------------------------------
कोल्हापूर: छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य आणि देखणी मूर्ती अमेरिकेतील फिनिक्स, अॅरिझोना येथे होत असलेल्या शिवजयंती उत्सवासाठी रवाना झाली आहे. SMAP फौंडेशनच्या वतीने अमेरिकेत दरवर्षी वेगवेगळ्या राज्यांमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यावर्षी फेब्रुवारी 2025 मध्ये होणाऱ्या शिवजयंती सोहळ्यासाठी लागणारी मूर्ती पलूस, सांडगेवाडी येथील प्रसिद्ध मूर्तिकार अनिल शिंदे पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी बनवली आहे. ही मूर्ती अमेरिकेत प्रतिष्ठापित केली जाणार आहे.
SMAP FOUNDATION चे अध्यक्ष श्री विजयजी पाटील यांनी या अप्रतिम कलाकृतीबद्दल मूर्तिकारांचे विशेष आभार मानले आहेत.
या संपूर्ण उपक्रमाच्या मार्गदर्शनासाठी श्री. रुपेश चव्हाण आणि रत्नावली पाटणे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. भारतातून मूर्तीच्या अंतर्गत बाबींची पूर्तता श्री. राहुल चव्हाण यांनी केली असून, संपूर्ण कामाच्या प्रगतीवर श्री. अविनाश कुमार यांनी देखरेख ठेवली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाथेचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने SMAP FOUNDATION दरवर्षी वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करत असते. यावर्षी अमेरिकेत होणाऱ्या शिवजयंती सोहळ्याचा केंद्रबिंदू ही भव्य मूर्ती असणार आहे, असे आयोजकांनी सांगितले.
Comments
Post a Comment