राधानगरी तालुक्यातील दोघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत.

 राधानगरी तालुक्यातील दोघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत.


---------------------------- 

राधानगरी प्रतिनिधी 

विजय बकरे 

----------------------------

काल दिनांक 31 जानेवारी रोजी राधानगरी तालुक्यातील मांगोली आणि ठिकपुर्ली येथे पाण्यात बुडून दोघाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. 

मांगोली येथील दत्तात्रय ईश्वरा पाटील हे येथील आपल्या नावली नावाच्या शेतामधील ऊस पिकाला पाणी पाजण्यासाठी गेले असता विहिरीवरील मोटार चालू करत असताना पाय घसरून विहिरीत पडले. ही घटना आसपासच्या शेतकऱ्यांना समजल्यानंतर त्यांनी पाटील यांना उपचाराकरिता सोळांकुर येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

तर ठिकपुर्ली येथील वैशाली सर्जेराव कांबळे ही चाळीस वर्षीय महिला सकाळी साडेदहाच्या सुमारास कॅनॉल मध्ये कपडे धुण्याकरिता गेली असता पाय घसरून पडल्यामुळे त्यांचा दुदैवी मुत्यू झाल्याची दुसरी घटना घडली 

त्यांनाही उपचार करता सोळांकुर रुग्णालयात नेल असता  डॉक्टरांनी मृत घोषित केले.

सदर दोन्ही घटनांची नोंद राधानगरी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली  अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल शेळके आणि पोलीस हेडकॉन्स्टेबल जठार हे करत आहेत.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.