नरंदे यात्रेतील कुस्ती मैदान थांबल्याने कुस्ती शौकिनांच्यात नाराजी.
नरंदे यात्रेतील कुस्ती मैदान थांबल्याने कुस्ती शौकिनांच्यात नाराजी. ------------------------ कुंभोज प्रतिनिधी विनोद शिंगे ------------------------ नरंदे तालुका हातकलंगले येथे नागनाथ देवाच्या यात्रेनिमित्त गेल्या पन्नास वर्षापेक्षा जास्त वर्षाची परंपरा असणारी कुस्तीचे मैदान यावेळी का थांबले असून त्यामुळे कुस्ती शौकिनांच्यातून नाराजी व्यक्त होत आहे. परिणामी नरंदे गावचे लोकनेते कै सिताराम बापू भंडारी यांनी कुस्ती परंपरेला सुरुवात केली व त्या कुस्ती परंपरेची सुरुवात म्हणून नरंदे गावचे ग्रामदैवत नागनाथ देवाच्या यात्रेनिमित्त केल्या पन्नास वर्षापासून जास्त कालावधीत नरंदे येथे यात्रेच्या तिसऱ्या दिवशी भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन केले जात होते. सदर कुस्ती मैदानमध्ये महाराष्ट्रातील नामवंत मल्लाचा सहभाग कुस्तीसाठी असायचा लोकनेते सिताराम बापू भंडारी यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव पैलवान बबन भंडारी यांनी सदर कुस्तीची परंपरा अबाधित ठेवली व त्यांनी ती अनेक वर्ष चालू ठेवली सदर नरंदे कुस्तीच्या मैदानातून अनेक मल्ल सध्या महाराष्ट्रात कार्यरत असून त्यापैकीच एक म्हणजे नरंदे गावचे सुपुत्र व ...