"मिले सुर मेरा, तुम्हारा ss तो, सूर बने हमारा ssss गोल्डन ज्युबली मित्रांचा स्नेहोत्सव एक आणि दोन फेब्रुवारीला !
"मिले सुर मेरा, तुम्हारा ss तो, सूर बने हमारा ssss गोल्डन ज्युबली मित्रांचा स्नेहोत्सव एक आणि दोन फेब्रुवारीला !
*,पेटाळा हायस्कूल तथा स.म.लोहीया हायस्कूल- कोल्हापूरचे सन १९७५ चे स्नेही वयाच्या ६५ वर्षानंतर भेटणार ! अनुभव -गप्पा- मनोरंजन च्या विश्वात रमणार .
मदन कदम | कुमार नाडकर्णी -- आयुष्याच्या ह्या वळणावर, मित्रांनी सहकुटुंब येणे हीच कल्पना सर्वांसाठी ऊर्जा देणारी आहे. कोल्हापूरच्या त्या वेळच्या पेटाळा हायस्कूल आणि आत्ताच स.म.लोहीया हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलेल्या आणि आज वयाची पासष्टी पूर्ण केलेल्या मित्रांनी एकत्र येत, "शाळा सोबती १९७५" हा ग्रुप तयार केला. मित्रांना एकत्र आणण्यात कोल्हापूरचा शेखर माने आणि तेथील सहकाऱ्यांनी कमांडर ची भूमिका बजावली.अन् स्नेहोत्सव साजरा करण्याची संकल्पना सर्वांनी अमलात आणली. यामध्ये डॉक्टर शिरीष कुलकर्णी, रमेश बक्षी,सुधीर महामुनी, मदन कदम ,राजेंद्र खराडे, अशोक राऊत , चं.गो.कुलकर्णी, दिलीप आमटे, एन.एम कुलकर्णी,सुनील मोटे,सुरेश निकम ,शशांक कशाळीकर, सीजी कुलकर्णी, मुरारी- सांगवेकर- मिलिंद देशपांडे- नितीन शुक्ला- जीएम लांजेकर, मुकुंद सोहनी, अरविंद हराळे, सुधीर भस्मे,मगर,जोशी, भोसले अशी कित्येक वर्गबंधू हिरिरीने सहभागी झाले.
चालू वर्षी सन २०२५ हे वर्ष शाळा सोडलेल्या या सर्वांना पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे हे स्नेहसंमेलन सुवर्ण महोत्सवी संमेलन असून, तारीख एक व दोन फेब्रुवारी २५ रोजी बालवाडी पासून अकरावी पर्यंत शिकलेल्या सर्व मित्रांनी आपल्या परिवारासह उपस्थित राहून सहकार्य करावे.शाळा सुटल्यानंतर प्रत्येक जण आपले करिअर करण्याच्या नादात नोकरी उद्योगांमध्ये व्यस्त असल्याने, एकमेकांपासून दुरावले आहेत.मात्र आयुष्याच्या पूर्वसंध्येला एकत्र येऊन शालेय जीवन, अनुभव, मनोरंजन, गप्पागोष्टी, शिक्षकांच्या आठवणी, आणि मिळणारी ऊर्जा याचे या वयात साक्षीदार होण्यासाठी तारीख एक मे रोजी ठीक सकाळी ८ ते १० पर्यंत कोल्हापूर- बिनकांबी गणेश मंदिराजवळ एकत्र यावे असे आवाहन आयोजक समितीतर्फे शेखर माने यांनी कळविले आहे. बाकी नियोजन सर्वांना कळविले आहेच.तरीसुद्धा सर्वांनी या ss भेटा sss आणि आयुष्याच्या पुढील वाटचालीसाठी रिचार्ज असे सर्वांनीच ठरविले आहे..
Comments
Post a Comment