दुर्गेवाडी येथील योगेश घोलप यांचा मुंबई येथे रेल्वे अपघातात मृत्यू.
दुर्गेवाडी येथील योगेश घोलप यांचा मुंबई येथे रेल्वे अपघातात मृत्यू.
------------------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
------------------------------------
दुर्गेवाडी तालुका हातकलंगले येथील योगेश तुलसीराम घोलप वसाहत नंबर १ या युवकाचा मुंबई येथे रेल्वेतून पडून मृत्यू झाला, सदर घटनेने दुर्गेवाडी परिसरात शोककळा पसरली असून योगेश मुंबई येथे प्रिंटिंग प्रेस मध्ये काम करत होता. रेल्वेतून प्रवास करत असताना डांबाला धडकल्याने योगेशचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. योगेशचे पार्थिव देह आज रात्री उशिरा दुर्गेवाडी येथे दाखल होणार असल्याची माहिती सरपंच सचिन घोलप यांनी दिली आहे.
Comments
Post a Comment