श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ. महाविद्यालयात येवता शाळेमध्ये महंत शांतीपुरी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्याना ब्लेंकेट वितरण"
श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ. महाविद्यालयात येवता शाळेमध्ये महंत शांतीपुरी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्याना ब्लेंकेट वितरण"
------------------------------
रिसोड प्रतिनिधी
रणजीत सिंह ठाकुर
------------------------------
दिनांक ०१/०१/२०२५ ला शिवाजी विद्यालय येवता येथे स्थानिक शाळा समिती अध्यक्ष महंत शांतीपुरी महाराज यांचा वाढदिवस मोठ्या हर्षउल्हासात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री लाव्हरे सर होते.तसेच प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक येथिल दानशुर कुटुंब दिघे परिवारातील सदस्य व शाळा समिती या सर्वांची उपस्थिती होती. सर्वप्रथम आपल्या प्रास्ताविक अभिभाषणामध्ये शाळेचे प्राचार्य मा. विजयकुमार ढेंगळे सर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता शाळेमध्ये विविध कार्यक्रम घेतले जातात, याबद्दल उपस्थित पालकांना माहिती दिली.तसेच नाशिक येथील दानशुर कुटुंब राबवित असलेल्या कुटुंबाचे आभार मानले. आपल्या प्रमुख भाषणामध्ये माननीय लाव्हरे सर यांनी शाळेत होत असलेल्या प्रगती बद्दल समाधान व्यक्त केले.तसेच नाशिक येथील दिघे कुटुंब मागिल चार वर्षापासुन वेगवेगळ्या प्रकारचे दान शाळेतिल सर्व मुलांना करत आहे त्याबद्दल त्यांचे शाळेच्या वतीने आभार व्यक्त केले.
Comments
Post a Comment