वाचनाने माणसाची स्मरणशक्ती व वैचारिक प्रगल्भता सुधारते : डॉ. जयवंत चौधरी.
वाचनाने माणसाची स्मरणशक्ती व वैचारिक प्रगल्भता सुधारते : डॉ. जयवंत चौधरी.
----------------------------------
वाई प्रतिनिधी
कमलेश ढेकाणे
----------------------------------
वाई: ०१/०१/२०२४ येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील ग्रंथालय विभाग, मराठी विभाग आणि कृष्णाली बुक वर्ल्ड सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” या अभियानाअंतर्गत वाचन चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी “पुस्तक प्रदर्शन – २०२५” या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन जनता शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. जयवंत चौधरी यांच्या हस्ते झाले. उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ. चौधरी म्हणाले, आजचे पुस्तक प्रदर्शन वाचकासाठी खऱ्या अर्थाने पर्वणी आहे. शिक्षकांच्या अध्ययन आणि अध्यापन या प्रक्रियेतील महत्वाचा घटक म्हणजे वाचन. शिक्षकांनी वाचन वाढवले तर त्यांचे अध्यापन अधिक परिणामकारक होईल त्यासाठी आपल्या महाविद्यालयाचे ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या पुस्तकांचा संदर्भ घ्यावा. वाचनाने माणसाची स्मरणशक्ती सुधारते, त्याचबरोबर वैचारिक प्रगल्भता देखील वाढते. मी स्वतः एक उत्तम वाचक असून किसन वीर पुस्तकप्रेमी या व्हाँट्सअप समुहावर पाठवित असलेल्या पुस्तक परीक्षणाचे वाचन सर्व प्राध्यापकांनी करावे व मुळ पुस्तकेही वाचावीत.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य, डॉ. गुरुनाथ फगरे सर म्हणाले की, वाचनाने माणसाचे व्यक्तिमत्व फुलते. ग्रंथांच्या सानिध्यात घालविलेला वेळ सत्कारणी लावून शिक्षक अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये नवचैतन्य निर्माण करतो. समाजाची नितीमत्ता व सुसंस्कृतता जपण्याचे शिवधनुष्य शिक्षकांनाच सांभाळावे लागेल याकरिता शिक्षकांनी सदैव नवविचारांची व नवउपक्रमांची जोपासना करण्यासाठी वाचनामध्ये वाहून घेतले पाहिजे. म्हणूनच ग्रंथ हेच खरे मित्र आहेत.
जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले यांनी पुस्तक प्रदर्शनास सदिच्छा भेट देवून वाचनीय ग्रंथाची खरेदी करून शुभेच्छा दिल्या. पुस्तक प्रदर्शनासाठी कृष्णाली बुक वर्ल्ड, सातारा यांनी आपली पुस्तके प्रदर्शनामध्ये मांडली होती. ग्रंथपाल डॉ. शिवाजी कांबळे यांनी प्रास्ताविक केले, तर कार्यक्रमाचे आभार मराठी विभागप्रमुख व कला शाखेचे उपप्राचार्य प्रा. डॉ. चंद्रकांत कांबळे यांनी मांडले, सूत्रसंचालन श्रीमती. सुमती कांबळे यांनी केले. सदर कार्यक्रमास श्रीमती. दैवता वाडकर, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य श्री. भीमराव पटकूरे, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. हनुमंत कणसे, प्रा.डॉ. सुनील सावंत, प्रा. डॉ. ज्ञानदेव झांबरे, प्रा. डॉ. भानुदास आगेडकर, प्रा. डॉ. विनोद वीर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. बाळासाहेब कोकरे, कार्यालय प्रमुख श्री. बाळासाहेब टेमकर, सहायक ग्रंथपाल श्री. धनाजी जाधव तसेच सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षिकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सदर प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथालय विभागातील कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. पुस्तक प्रदर्शनास २०० हून अधिक वाचकप्रेमींनी भेट दिली.
Comments
Post a Comment