गोटे महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राच्या या उपक्रमाच्या अंतर्गत लेखक व विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचे आयोजन.
गोटे महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राच्या या उपक्रमाच्या अंतर्गत लेखक व विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचे आयोजन.
-----------------------------------
रिसोड प्रतिनिधी
रणजीत सिंह ठाकुर
-----------------------------------
मातोश्री शांताबाई गोटे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी लेखक व विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.हा कार्यक्रम ग्रंथालय विभाग आणि हिंदी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.व्ही.एन लांडे तर प्रमुख उपस्थितीत डॉ. विलास गायकवाड,डॉ. राजकुमार बोंडे व डॉ. एस. व्ही.रुक्के डॉ. विलास गायकवाड यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला असून त्यांनी आजच्या विद्यार्थ्यांनी वाचन केले पाहिजे जेणेकरून एखाद्या विषयाचा सखोल ज्ञान त्यांना घेता येईल.आज मोबाईल मुळे विद्यार्थी वाचनापासून दूर गेला आहे. वाचन संस्कृती जपली पाहिजे यावर भर दिले. वाचन संकल्पना माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी काव्यवाचन,कथा वाचन व निबंध वाचन आदि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. व्ही. एन. लांडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला असून विद्यार्थ्यांनी एखाद्या लेखकाला भेटले पाहिजे ह्या विषयी माहिती दिल या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख डॉ. एस. व्ही.यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. राजकुमार बोंडे यांनी केले .कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment