रिसोड येथे नव-वर्षाचे स्वागत वृक्षारोपणाणे.

 रिसोड येथे नव-वर्षाचे स्वागत वृक्षारोपणाणे.

---------------------------------- 

रिसोड प्रतिनिधी

रणजित सिह. ठाकुर 

---------------------------------- 

 प्रत्येक नववर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्या जवळचे मित्रगण तसेच नातेवाईक एकमेकांना "नविन वर्ष सुख,समाधान व भरभराटीचे जावो" अश्या प्रकारच्या शुभेच्छांचा वर्षाव करित असतात.ह्या आपुलकीच्या शुभेच्छांचा जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.पण खरचं, फक्त शुभेच्छांच्या वर्षावाने माणसाची भरभराट होते का? तर हे शक्य नाही.भरभराटीसाठी तसेच मनशांतीसाठी प्रत्येकालाच कोणते तरी विधायक कार्यच करावे लागेल.असे मत प्राचार्य गजानन मुलंगे ह्यांनी लोणी रोड तसेच गणेशपुर चौक येथे आयोजित नव- वर्ष्यानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम दरम्यान व्यक्त केले.कार्यक्रमाकरिता विष्णु जटाळे वनपाल,निर्मला दिघोळे वनपाल,रमेश कदम वनरक्षक सामाजिक वनीकरण विभाग वाशिम परिक्षेत्र रिसोड,सेवानिवृत्त मुख्याध्यापक मदन चौधरी,अध्यापक गुणवंत थोरात,वृक्षमित्र नवनाथ खैरे,वर्षा देशमुख पर्यवेक्षिका, प्राध्यापिका शुभांगी चवरे,प्राध्यापिका वंदना सरनाईक, अध्यापिका राखी मोरे श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वाकद प्रामुख्याने उपस्थित होते.नव वर्षानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे विश्लेषण करतांना मुलंगे म्हणाले कि,कोणतेही मूल सज्ञान होईपर्यंत ते समाज आणि निसर्गाच्या साहाय्याने जीवन व्यतीत करत असते हे एक प्रकारचे समाज व निसर्गऋण त्याच्यावर असते असे म्हणणे वावगे होणार नाही.याची परतफेड जोपर्यंत एखाद्या विधायक कार्याच्या माध्यमातून होत नाही तोपर्यंत हॅपी न्यू इयर संकल्पना सार्थकी लागणार नाही हे तेवढेच खरे.ह्याची परतफेड करण्याकरिता फार काही मोठं काम करावं लागत नाही,आपल्या ऐपती प्रमाणे अतिशय छोट्या कार्याद्वारे सुद्धा सदर्हु ऋणाची परतफेड होते हे निश्चित.नववर्षाच्या शुभेच्छांची देवाण-घेवाण किंवा एखाद्या कामाचा संकल्प करणे इथेच न थांबता प्रत्येकाने शक्य तितक्या लवकर त्या संकल्पनांना कृतीत आणण्याचा प्रयत्न करावा कारण समर्थ रामदास स्वामींच्या उक्तीप्रमाणे "केल्याने होत आहे रे,आधी केलेची पाहिजे" जेणेकरून आप्तस्वकियांच्या शुभेच्छा सार्थकी लागतील.चला तर मग,करू या सुरूवात एखाद्या जनहितार्थ विधायक कार्याला! कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता धनंजय माळेकर,शामू शेळके,पूजा शेळके, ज्ञानेश्वर खडसे,धीरज जाधव इत्यादींनी मोलाचे योगदान दिले.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.