कुंभोज परिसरात एसटी एक आणि प्रवासी अनेक, प्रमाणापेक्षा जादा प्रवाशांची एसटीतून होते वाहतूक.
कुंभोज परिसरात एसटी एक आणि प्रवासी अनेक, प्रमाणापेक्षा जादा प्रवाशांची एसटीतून होते वाहतूक.
------------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
------------------------------
कुंभोज तालुका हातकणंगले येथे सध्या एसटी एक आणि प्रवासी आनेक अशी अवस्था निर्माण झाली असून सध्या कुंभोज व परिसरातून इचलकरंजी पेठ वडगाव व अन्य ठिकाणी शालेय शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या फारच मोठी आहे .
त्याच पद्धतीने शासनाने महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत दिल्याने एसटीने प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या वाढली असून प्रवाशांची संख्या जरी वाढली तरी एस टिची संख्या मात्र फारच कमी झाली असल्याचे चित्र दिसत असून कुंभोजसह परिसरतुन दिवसभरातून हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच बसेस सुरू आहेत.
प्रवासांची संख्या वाढल्याने एका एका बसेस मध्ये शंभर पेक्षा जास्त प्रवासी व विद्यार्थी प्रवास करत असल्याचे चित्र दिसत असून एसटी महामंडळाचे सदर गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी प्रमाणापेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करत असताना कोणताही अपघात अथवा अन्य घटना घडल्यास याला जबाबदार कोण? परिणामी एसटी महामंडळाची चेकर वारंवार एसटीचे चेकिंग करतात परंतु त्यांना एसटीमध्ये असणारी प्रमाणापेक्षा जास्त वाहतूक करणारे प्रवासी मात्र दिसून येत नाहीत का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला असून कुंभोज येथे विद्यार्थी वाहतुकीच्या साठी ज्यादा बसेस सुरू करण्याची मागणी सध्या विद्यार्थी व पालकांच्या तो जोर धरत आहे .
याबाबत वारंवार एसटी महामंडळाची संपर्क साधून ही त्यावरती कोणतेही उपाययोजना केली जात नसल्याने कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच विद्यमान आमदार खासदारांनी यामध्ये लक्ष घालून विद्यार्थ्यांच्या प्रवासाची सोय करावी अशी मागणी विद्यार्थी व पालक वर्गातून जोर धरत आहे. विनोद शिंगे कुंभोज
Comments
Post a Comment