माळेगाव यात्रेस मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट; श्रीखंडोबाचे घेतले दर्शन.

 माळेगाव यात्रेस मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट; श्रीखंडोबाचे घेतले दर्शन.

-------------------------------

लोहा प्रतिनिधि 

अंबादास पवार 

-------------------------------

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी आज श्रीक्षेत्र माळेगाव येथे आयोजित यात्रेस भेट देऊन आनंद व उत्साहाचा अनुभव घेतला. त्यांनी श्रीखंडोबाचे दर्शन घेतले आणि यात्रेतील विविध उपक्रमांचा आढावा घेतला.

     यात्रेदरम्यान घोडेबाजारातील विविध घोड्यांची पारख करत त्यांनी या अनोख्या परंपरेचे कौतुक केले. तसेच शंकरपट स्पर्धेस भेट देऊन स्पर्धकांचे मनोबल वाढवले. यात्रेच्या चैतन्यमय वातावरणाने व सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्सवाला वेगळाच रंग दिला आहे.

    या प्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रवीणकुमार घुले, पोलीस निरीक्षक नीलपञे, कार्यकारी अभियंता संजय शिंदे, गट विकास अधिकारी दशरथ आडेराघो, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांचे स्वीय सहायक शुभम तेलेवार उपस्थित होते. यात्रेतील गर्दी, विविध स्टॉलची सजावट व पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रमांनी माळेगाव यात्रा आनंदोत्सवाचे मूर्त रूप ठरली आहे.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.