एकाच घरात दोन पक्ष भाजपाचे नेते रावसाहेब दानवे , राणे यांनाच माजी आमदार राजूरकर यांचे आव्हान.
एकाच घरात दोन पक्ष भाजपाचे नेते रावसाहेब दानवे , राणे यांनाच माजी आमदार राजूरकर यांचे आव्हान.
------------------------------
लोहा प्रतिनिधि
अंबादास पवार
------------------------------
अकरा महिण्या पूर्वी भाजपा मध्ये प्रवेश केलेले माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांनी एकाच घरात दोन पक्ष चालणार नाहीत असे जाहीर वक्तव्य केले पण पक्षाचे जेष्ठ नेते माजी मंत्री रावसाहेव दानवे, माजी मंत्री नारायण राणे, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनाही हे लागू पडते यांचा त्यांना चिखलीकर विरोधासमोर विसर पडला परंतु
या वक्तव्यामुळे निष्ठावंतात तीव्र असंतोष पसरला असून ही काँग्रेस नव्हे भाजपा आहे .येथे शिस्त व पक्षाचे अनुपालन पाळावे लागते असे माजी उपसभापती नरेंद्र गायकवाड यांनी आठवण करून दिली आहे
लोहा कंधार तालुक्यात आ चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे निष्ठेने काम करणारे लोहा पंचायत समितीचे माजी उपसभापती नरेंद्र गायकवाड यांनी या वक्तव्यावर रोखठोक भूमिका मांडली.
अकरा महिन्यांपूर्वी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस पक्षातून भाजपा मध्ये प्रवेश केला त्याच्या सोबत अनेकांसह माजी आमदार राजूरकर हे सुद्धा भाजपा मध्ये आले.पण गेल्या सात आठ वर्षा पासून जिल्ह्यात प्रतापराव पाटील यांनी भाजपा बूथ पातळीवर बळकट केली.कार्यकर्त्यांचा बळ दिले. लोकसभा निवडणूकीत अशोकराव समर्थक काँग्रेसमध्येच राहिले आणि त्यांनी भाजपा च्या परभवासाठी जीवाचे रान केले. लातूर नांदेड लोकसभा पक्षाच्या हातून गेली .पोटनिवडणुकीतही पराभव झाला .ते
तो कोणाच्या प्रवेशामुळे झाले अमरभाऊ हे सर्वश्रुत आहे
भाजपा मध्ये काँग्रेस सारखे कानात बोलले की काहीही होते असे नाही आम्ही पक्षासाठी जीवाचे रान केले
.माजी आमदार राजूरकर प्रदेश उपाध्यक्ष आहात पण मराठवाडा संघटक, जिल्हाध्यक्ष , लोकसभा, विधानसभा संघटक, तालुकाध्यक्ष याना पक्षात वेगळे स्थान असते जबाबदारी आहे कॉग्रेस सारखे नाही
ज्यांनी भाजपा च्या पराजयासाठी जीवाचे रान केले त्याच्यासाठी माजी आमदार राजूरकर हे पायघड्या घालत आहेत ते फक्त आमदार चिखलीकर यांच्या विरोधासाठी ते असेच करताहेग
या दोन्ही तालुक्यात काँग्रेस वाढू दिली नाही त्यांना पक्षाचे काहीच घेणेदेणे नाही चिखलीकर विरोधकांना बळ देण्यातच त्यांनी पक्षाची वाताहत केली तीच सुरुवात आता या दोन्ही तालुक्यात भाजपा या पक्षाची होणार आहे.स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकरण मतदार संघातून पुन्हा आमदार होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या राजूरकर यांच्या समोर मोठे आव्हान उभे आहे
प्राणिताताई यांचे पक्षासाठी किती कार्य आहे हे अख्ख्या जिल्ह्याला व प्रदेश भाजपा ला माहिती आहे.अमरनाथ राजूकरकर यांच्या पेक्ष्या त्या पार्टीत वरिष्ठ आहेत शिवाय निष्ठावंत आहेत.पक्षाने दिलेली जबाबदारी त्या जबाबदारीने पूर्णत्वास नेतात। कंधार येथे भाजपा मेळाव्यात निष्ठावंत मागे कट्टर विरोधक पुढे असे चित्र होते भाजपाचे नेते माजी मंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे माजी मंत्री खा.नारायण राणे, यांचा अकरा महिन्यात पक्षात आलेल्या माजी आमदार राजूरकर यांनी आव्हान दिले.त्यामुळे निष्ठावंतानी तेथेच भाजपा शिस्तीचा पक्ष असून काँग्रेस पक्ष नाही जे वाट्टेल ते बोलायला जरा विचार करून बोलले पाहिजे असा सूर उमटला आहे गेल्या अनेक वर्षा पासून महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा प्राणिताताई देवरे चिखलीकर याच्या मार्गदर्शनाखाली भाजपा संघटना बूथ पातळीवर पक्ष बळकट करणाऱ्या व ध्येयधोरणे घरोघरी पोहचविणाऱ्यर्य कार्यकर्त्यांनी माजी आमदार राजूरकर याना सबुरी व श्रद्धा ठेवा असा सल्ला नरेंद्र गायकवाड यांनी दिला आहे
Comments
Post a Comment