ई- कॉमर्सच्या खरेदीमध्ये ग्राहकांनी अधिक सजग राहण्याची आवश्यकता प्राचार्य डॉ.कुलकर्णी.
ई- कॉमर्सच्या खरेदीमध्ये ग्राहकांनी अधिक सजग राहण्याची आवश्यकता प्राचार्य डॉ.कुलकर्णी.
---------------------------------
रिसोड: प्रतिनिधी.
रणजीत सिंह ठाकुर.
---------------------------------
रिसोड.येथील उत्तमचंद बगडिया कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागाद्वारे राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनोद कुलकर्णी तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.अरविंद मनवर उपस्थित होते सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यानंतर प्रा. डॉ.मनोज नरवाडे यांनी आपल्या प्रास्ताविकातून कार्यक्रमाची रुपरेषा विशद करुन ग्राहक दिन साजरा करण्याचा उद्देश सांगितला यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा.अरविंद मनवर यांनी ग्राहकांनी वस्तूंची खरेदी करताना कोणत्या गोष्टी कटाक्षाने पाळल्या पाहिजे या संदर्भात मार्गदर्शन केले तसेच आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. विनोद कुलकर्णी यांनी ई- कॉमर्सच्या माध्यमातून खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे त्यामुळे ई-कॉमर्सच्या माध्यमातून ग्राहकांची फसवणूक देखील होताना दिसून येत आहे त्यामुळे ई-कॉमर्सच्या खरेदीमध्ये ग्राहकांनी अधिक सजग राहण्याचे आवश्यकता असल्याचे विशद केले
कार्यक्रमाचे संचालन कु. वैष्णवी घोडे हिने तर आभार प्रदर्शन कु. उर्मिला गिरी हिने केले या कार्यक्रमाकरिता महाविद्यालयातील प्रा. एस. व्ही.टिकार, प्रा.डॉ.के. के. बुधवंत ,प्रा.डॉ.ए. जी. वानखेडे, प्रा.डॉ. पि. के. नंदेश्वर,
प्रा. डॉ. खेडेकर मॅडम, प्रा.डॉ. कोमल काळे, प्रा. संजना वानरे, प्रा. दशरथ प्रजापती व श्री. ओंकार पुरी. श्री. सुनील च-हाटे,सुरज नरवाडे, गजू जाधव व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment