पैशासाठी अक्षय काढायचा भांडण.भांडणानंतर भाग्यश्रीला संपवले पोलिसांनी केली पतीला अटक.
पैशासाठी अक्षय काढायचा भांडण.भांडणानंतर भाग्यश्रीला संपवले पोलिसांनी केली पतीला अटक.
----------------------------------
अमरावती जिल्हा प्रतिनिधी
पी.एन.देशमुख.
----------------------------------
अमरावती.
अमरावती शहरातील यशोदा नगर भागातील भोवते लेआउट मधील सौ.भाग्यश्री लाडे वय२८, वर्षीय हिचा तिच्या पतीनेच खून केल्याचे गुरुवारी रात्रीसमोर आले दरम्यान फ्रेझर पुरा पोलिसांनी भाग्यश्रीचा मारेकरी पती अक्षय लाडे ला शुक्रवारी दिनांक 3 रोजी पहाटे अटक केली लग्नात प्रेजेंट कमी आल्याने तो वारंवार पत्नी भाग्यश्रीला माहेरवरून पैसे आणण्यासाठी छळ करित होता .त्याच्याा कारणातून त्यांच्यात भांडण झाले त्या भांडणानंतर नियोजन बद्ध कट रचून, भाग्यश्रीचा गळा आवळून नंतर गळा चिरून खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले अक्षय आणि भाग्यश्री यांचा सात वर्षांपूर्वी प्रेम विवाह झाला होता .लग्नात तुझ्या माहेरच्यांनी प्रेझेंट कमी दिले म्हणून तो वारंवार त्रास द्यायचा भाग्यश्री तुझ्या माहेरच्यांनी प्रेझेंट कमी दिले म्हणून तो वारंवार भाग्यश्रीला माहेरवरून पैसे आणायला सांगत होता .मध्यंतरी त्यांनी सोपासेट घेण्यासाठी पैसे मागितले होते .त्यावेळेस त्यांना सासरवाडीतून पैसे आणून दिले होते .तरी पण त्याची पैशाची भूक थांबली नव्हती. याच कारणातून त्यांच्यात खटके उडायचे .याच कारणातून सदर प्रकरण घडल्याचे स्पष्ट होते. अडीच वर्षांपूर्वी अक्षय आणि भाग्यश्री मध्ये वाद झाला .नंतर भाग्यश्री माहेरी राहायला गेली होती .एक ते दीड वर्ष भाग्यश्री माहेरीच होती .दरम्यान सहा महिन्यापूर्वी भाग्यश्री पुन्हा अक्षय कडे नांदण्यासाठी आली होती. 3१ डिसेंबरला अक्षय आणि भाग्यश्री यांच्या वाद झाला त्यावेळी भाग्यश्री घरातून निघून गेली.१जानेवारीला , रात्री भाग्यश्रीने अक्षयला फोन केला तुमचा राग शांत झाला असेल तर मी घरी येऊ का असे विचारले त्यावर अक्षयने नाही म्हणत फोन कट केला.त्यानंतर थोड्यावेळाने अक्षयने भाग्यश्री ला फोन करून तू घरी येऊन तुझे कपडे घेऊन जा असे सांगितले त्यामुळे भाग्यश्री रात्री ९वाजण्याच्या सुमारास आईच्या घरुन अक्षय कडे आली.परंतु ही आईच्या घरी परत गेली नाही कॉल लागत नाही किंवा मुलगी रात्रभर मुलगी घरी न आल्यामुळे माहेरच्यांनी तिचा शोध सुरू केला त्यावेळी त्यांना संशय आला व त्यांनी पोलिसात तक्रार दिली दरम्यान भाग्यश्रीचा अक्षयच्या घरातच, तिचा मृतदेह आढळला खून केल्यानंतर अक्षयने भाग्यश्रीच्या मृतदेह झाकून ठेवत पळ काढला होता त्याला शुक्रवारी पहाटे पोलिसांनी अटक केली आहे मृत भाग्यश्री चा गळा आवळल्या नंतर अक्षयने अमानुषपणे भाग्यश्रीचा गळा चीरला, त्यानंतर धारदार शास्त्राने तिच्या गळ्यावर वार केला तिचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने रक्ताचे डाग पुसून टाकले त्यानंतर मृतदेहावर ब्लॅंकेट व इतर कपडे टाकून झाकून ठेवला आणि घराला बाहेरून कडी फरार झाला.
Comments
Post a Comment