आमदार भावनाताई गवळी यांचा एक फोन आणि पांदण रस्त्याने घेतला मोकळा श्वास.

 आमदार भावनाताई गवळी यांचा एक फोन आणि पांदण रस्त्याने घेतला मोकळा श्वास.

---------------------------------- 

 रिसोड.प्रतिनिधी 

 रणजीत सिंह ठाकुर 

---------------------------------- 

 रिसोड तालुक्यातील मांगवाडी गावामध्ये मंगवाडीच्या शेत शिवारामध्ये जाण्यासाठी मांगवाडी ते आगरवाडी हा पानंद रस्ता सुमारे 50 वर्षापासून लुप्तप्राय झालेला होता. शेतामध्ये जाण्याकरता या शिवारातील शेतकऱ्यांना रस्ताच नव्हता. पावसाळ्यामध्ये पाऊलवाटेने चिखल तुडवत शेतामध्ये जावे लागत असे पावसाळ्यात शेतीच्या मशागतीची साधने व बी  - बियाणे नेण्याकरता शेतकऱ्यांना मोठी तारेवरची कसरत करावी लागत असे. या सर्व बाबी विचारात घेता मांगवाडी गावातील शेतकऱ्यांचे एक शिष्ट मंडळ 31 डिसेबर रोजी भेटले. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी एक जानेवारी 2025 रोजी तर प्रत्यक्ष रास्ता कामाची माडणीच झाली़निवेदन घेऊन विधान परिषदेच्या विद्यमान आमदार भावनाताई गवळी यांच्याकडे पोहोचले. शेतकऱ्यांच्या प्रश्नप्रति विशेष जिव्हाळा असणाऱ्या कृषी कन्या भावनाताई गवळी यांनी या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन  रिसोड च्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांना याबाबत सुचित केले. तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर  सुद्धा शेतकऱ्यांच्या या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन गतिमान चक्री फिरवली  आणि. महसूल प्रशासनाला शेतकऱ्यांच्या बांधावर पाठविले हरवलेला रस्ता सर्व सहमतीने शोधून काढला. याप्रसंगी हा रस्ता बनविण्यामध्ये शिवसेनेचे उपतालुका प्रमुख शंकर मोरे.माजी उपसभापती विजयरावजी पौळ.सौ गोदावरीताई वाळके. पार्वती ताई गायवाळ,मंगल गजानन जाधव अयोध्या रामकिसन जाधव. यांच्या उपस्थितीमध्ये महसूल प्रशासनाचे मंडल अधिकारी समाधान जावळे. तलाठी राजेंद्र जाधव.महसूल सेवक प्रकाश कांबळे व इतर गावकरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा रस्ता बनवण्याचे काम तातडीने सुरू झाले. कर्तव्यनिष्ठ आमदार भावनाताई गवळी ह्या ॲक्शन मोडवर येऊन त्यांनी मांगवाडी च्या शिवारातील शेतकऱ्यांच्या प्रति मी तिने हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले व ते भावनाताई गवळी यांचे आभार व्यक्त करताना दिसून आलेत.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.