स्मार्ट मीटर सक्ती विरोधात मुरगूडमध्ये अधिकाऱ्यांना घेराव.

 स्मार्ट मीटर सक्ती विरोधात मुरगूडमध्ये अधिकाऱ्यांना घेराव.

------------------------------

मुरगूड प्रतिनिधी

जोतीराम कुंभार

--------------------------

सध्या सर्वत्र स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती केली जात आहे या विरोधात मुरगुड शहरांमध्ये महावितरण अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला यावेळी या स्मार्ट मीटरमुळे रिचार्ज संपल्यानंतर वीज आपोआप खंडित होईल त्याचबरोबर हे मीटर बसल्यानंतर वीज दरामध्ये वाढ होईल अशा शक्यता निर्माण झाले आहेत गरिबांवरती घाला घालण्याचे काम या स्मार्ट मीटरमुळे होईल त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा शून्य वीजबिल थकबाकी कडे वाटचाल करत असताना या रिचार्ज वाल्या स्मार्ट मीटरची सक्ती का अशी  विचारणा केली त्याचबरोबर या स्मार्ट मीटरमुळे मीटर रीडिंग घेणारे यासह अनेक कंत्राटी कामगारांसह संपूर्ण महावितरणच खाजगीकरणाकडे वाटचाल करत आहे यामुळे भविष्यात जशी बीएसएनएलची अवस्था झाली तशी महावितरणची देखील अवस्था होण्याची शक्यता निर्माण झाली आहे  त्यामुळे हे स्मार्ट मीटर बसवू नये अन्यथा आंदोलन करण्यात येईल असे निवेदन मुरगूड शहरातील नागरिकांनी दिले यावेळी 

 उपकार्यकारी अभियंता 

उपविभाग मुरगुड

शरद कुमार संकपाळ

,प्रकाश पाटील सहाय्यक अभियंता 

मुरगूड शहर शाखा अधिकारी,

नवनाथ डवरी सहाय्यक अभियंता

मुरगुड ग्रामीण शाखा अधिकारी यांनी हे निवेदन स्वीकारले तसेच आपली मागणी वरिष्ठापर्यंत पोहचवू असे आश्वासन दिले यावेळी राष्ट्रवादी शहर अध्यक्ष रणजीत सूर्यवंशी शिवभक्त सर्जेराव भाट, दगडू शेणवी , ओंकार पोतदार,दत्ता मंडलिक ,संदीप उर्फ गब्बर भारमल, सोमनाथ यरनाळकर उत्तम कापसे,उदय शहा, रंगराव चौगुले ,राहुल शिंदे , अमर चौगुले , जगदीश गुरव संकेत भोसले , प्रशांत सिद्धेश्वर,शुभम वंडकर ओकार महेतर शशिकांत पाटील प्रथमेश ढेरे विश्वजीत रामाने आकाश हरांबळे यांच्या सह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.