मस्साजोग सरपंच देशमुख हत्याप्रकरणी सूत्रधारासह संशयित आरोपीना तात्काळ अटक करा, सरपंच परिषदेचे हातकणंगले तहसीलदाराना निवेदन.
मस्साजोग सरपंच देशमुख हत्याप्रकरणी सूत्रधारासह संशयित आरोपीना तात्काळ अटक करा, सरपंच परिषदेचे हातकणंगले तहसीलदाराना निवेदन.
------------------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
------------------------------------
मस्साजोग ता. केज जि.बीड येथील युवक सरपंच संतोष देशमुख यांचे दिनांक ९ डिसेंबर रोजी बीड जिल्ह्यातील राजकीय गुंडांच्या आश्रयाखाली, समाज कंटकानी अपहरण करून त्यांची क्रूर व अमानुषपणे हत्या करून माणुसकीला काळीमा फासला आहे. लोकनियुक्त सरपंच संतोष देशमुख यांची हत्या बीड जिल्ह्यात फोफावलेल्या राजकीय गुंडगिरीतून झाली आहे.
खून प्रकरणातील संशयित आरोपीचा पोलीस तपास करून तात्काळ अटक न झाल्यामुळे राजआश्रया खाली मोकाटपणे फिरत आहेत. सरपंच परिषदेचे राज्यातील सर्व ग्रामपंचायतचे सरपंच यांच्यामध्ये शासन, पोलीस प्रशासन व पोलीस तपास बाबत असंतोषाचा प्रचंड भडका उडाला आहे.
सरपंच देशमुख हत्याकांड प्रकरणी सरपंच परिषद, मुंबईने संपूर्ण राज्यभर जिल्हास्तरावर गुन्हा तपास व अटके बाबत निषेध, निवेदन, मोर्चा, आंदोलन अशा अनेक मार्गाने शासनाचे लक्ष वेधले आहे तथापि हत्याकांडाला 22 दिवस झाले तरीसुद्धा हत्याकांडातील मास्टरमाइंड गुन्ह्याचा सूत्रधार, संशयित फरारी आरोपी यांना अद्याप अटक झाली नाही. तसेच दोषी पोलीस अधिकारी यांच्यावर प्रशासकीय कारवाई ऐवजी खुनात सहभागाचा गुन्हा नोंद झाला नाही.
सरपंच देशमुख हत्याकांडातील सूत्रधार तसेच संशयित आरोपींना येत्या आठवड्यात तात्काळ अटक न झालेस सरपंच परिषदचे गावागावातील ग्रामपंचा जरयतचे सरपंच प्रखर आंदोलन उभे करतील. तसेच सरपंच परिषदेचे प्रदेश अध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांनी जाहीर केले प्रमाणे ७ जानेवारी रोजी आझाद मैदान मुंबई येथे राज्यातील सर्व सरपंचांचे लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात येईल असे सांगितले.यावेळी राजाराम पोतनीस (प्रदेश सरचिटणीस, शिवाजी आप्पा मोरे (प्रदेश कार्यकारणी सदस्य व विश्वस्त) इजी.जी एम पाटीन (जिल्हाध्यक्ष ) अॅड. दयानंद पाटील (जिल्हा समन्वयक) राहुल शेटे ( सरपंच हेरले प्रभारी सरचिटणीस) संतोष शिंदे माळी उपस्थित होते.विनोद शिंगे कुंभोज
Comments
Post a Comment