निवडणुकीदरम्यान उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

 निवडणुकीदरम्यान उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

---------------------------------

 रिसोड प्रतिनिधी

रणजीत सिंह ठाकुर.

---------------------------------

 2024 मध्ये संपन्न झालेल्या रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी निवडणुकीदरम्यान उत्कृष्ट कार्य करून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी भुनेश्वरी एस. व रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली देवकर त्यांच्या नेतृत्वात वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त वाशिम येथे तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.रिसोड मालेगाव विधानसभा मतदार संघाच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून ते निवडणूक निकालापर्यंत कोणताही अनुचित प्रकार न घडता निवडणुका शांततेत पार पडल्या.यादरम्यान मतदार संघात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी गावागावात विविध पथकाद्वारे जनजागृती करून मतदान का केले पाहिजे याबद्दल उत्कृष्ट कार्य करून मतदानाची टक्केवारी वाढविल्याबद्दलया उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस. व उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांच्या नेतृत्वात वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.