रेणुकामाता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गोवर्धन येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी.

रेणुकामाता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गोवर्धन येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी.


----------------------------------

रिसोड प्रतिनिधी.

रणजीत सिंह ठाकुर 

----------------------------------

 रिसोड तालुक्यातील गोवर्धन येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती रेणुकामाता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गोवर्धन येथे उत्साहात साजरी करण्यात आली. शिरपूर जैन येथील पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सुबोध वाघ होते.यावेळी मंचकावर प्रफुल देशमुख. अजाबराव अंभोरे उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने झाली. प्रा. राजेश अंबाडकर यांनी प्रास्ताविक भाषणात सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षमय जीवनाचा आढावा घेतला. त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजात क्रांती घडवण्याच्या सावित्रीबाईंच्या कार्याचा गौरव करत मुलींनी त्यांचे विचार आचरणात आणण्याचे आवाहन केले.

प्रमुख पाहुणे रामेश्वर चव्हाण यांनी "सावित्रीच्या लेकी" होण्याचे आवाहन करत मुलींना शिक्षण, स्वावलंबन आणि आत्मसन्मानाचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी स्त्रियांच्या हक्क आणि सुरक्षेसाठी असलेल्या विविध कायद्यांची माहिती देत ती प्रभावीपणे वापरण्याचे मार्गदर्शन केले

प्रा. पुष्पा वाघ यांनी मुलींना वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उपलब्ध असलेल्या संधींची माहिती दिली. त्यांनी विशेषतः विज्ञान, तंत्रज्ञान, कला आणि व्यवसाय क्षेत्रात मुलींनी मोठ्या प्रमाणात पुढे येण्याचे आवाहन केले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य सुबोध वाघ यांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाईंच्या विचारांनी प्रेरित होऊन कठोर परिश्रम करण्याचे आवाहन केले. तसेच शिक्षणाद्वारे स्वतःचा विकास करून प्रशासनात प्रवेश करण्याचा ध्यास घ्यावा, असे मार्गदर्शन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे संचालन संजीव कोकाटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक शालिकराम नागरे यांनी केले. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचे पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या शिक्षकवर्गाने विशेष परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.