प्लास्टिक चहाच्या कपावर बंदी आणण्यासाठी पत विक्रेता सदस्याच्या वतीने निवेदन.
प्लास्टिक चहाच्या कपावर बंदी आणण्यासाठी पत विक्रेता सदस्याच्या वतीने निवेदन.
----------------------------------
रिसोड प्रतिनिधी
रणजीत सिंह ठाकुर
----------------------------------
प्लॅस्टिक चहाच्या कपावर कायमची बंदी आणावी या मागणीसाठी तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सतीश शेवदा यांना पत विक्रेता सदस्याच्या वतीने 3 जानेवारीला निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद केले आहे की, सर्वत्र प्लास्टिक कागदी कपाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून, प्लॅस्टिकचे कागदी कप बनविताना त्यामध्ये बीपीए नामक केमिकलचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो त्यामुळे त्या प्लॅस्टिकच्या कपात गरम चहा किंवा गरम पाणी टाकल्यास कपाच्या आतील भाग वितळतो आणि अशा कपातून चहा घेतल्यास लाखो मायक्रो प्लास्टिकचे कण पोटात जातात आणि कॅन्सर सारखा दुर्धर आजार होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे प्लास्टिक कागदी कपावर तात्काळ बंदी आणून प्लास्टिक कागदी कप विकणारे व हॉटेलमध्ये वापर करणाऱ्या दुकान मालकावर योग्य ती कारवाई करावी. प्लास्टिक कागदी कपातून चहा घेतल्यास किंवा गरम पाणी पिल्यास कॅन्सर सारखा दुर्धर आजार होऊन त्यामध्ये व्यक्तीला जीव सुद्धा गमावा लागतो त्यामुळे प्लास्टिक कागदी कपावर बंदी आणणे गरजेचे आहे असे निवेदनात नमूद केले आहे.आपण तात्काळ आमच्या निवेदनाची दखल घेऊन प्लास्टिक कागदी कपावर बंदी आणण्यासाठी पुढाकार घ्याल अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. निवेदन देताना पथविक्रेता सदस्य जालिंदर देवकर, प्रभाकर सराफ, संदीप सोनटक्के, रामकिसन शिंदे, रेखाताई गवळी, कल्पना जुमडे, केशव गरकळ, गजानन निखाते, माजी नगरसेवक फैयाज भाई यांच्यासह पदविक्रेता सदस्य उपस्थित होते.
Comments
Post a Comment