कोरेगावमध्ये छोटा गंधर्व नाट्यगृह झाले पाहिजे.
कोरेगावमध्ये छोटा गंधर्व नाट्यगृह झाले पाहिजे.
----------------------------
सातारा : प्रतिनिधी
----------------------------
कण्हेर (गणेशनगर),ता. सातारा येथील सुनील बाबुराव वाघमळे यांना छोटा बालगंधर्व स्मृती पुरस्कार कोरेगाव येथील माहेश्वरी मंगल कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.
कोरेगाव येथील छोटा गंधर्व प्रतिष्ठान व पुणे येथील बालगंधर्व संगीत मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वरराज छोटा गंधर्व स्मृतिदिनानिमित्त सुनील वाघमाळे यांच्यासह रुपचंद चव्हाण,श्रीकांत गिरगाव,रोहन पवार व स्वरराज छोटा गंधर्व गुणगौरव पुरस्कार केदार केळकर यांना मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.तेव्हा वर्षभरात नाट्यगृह होण्याबाबत अनेकांनी भाष्य केले.
कल्याणी व बकुळाताईंनी गायन केलेल्यासंगीत मैफिलीचा मनमुराद आनंद श्रोत्यांनी घेतला.यावेळी वारकरी महामंडळाचे उपाध्यक्ष मदन महाराज कदम,शिवचरित्र व्याख्याते आझाद महाराज गुजर,पंडित व्यास,श्रीकांत कात्रे,डॉ.सच्चिनांद,प्रवीण जाधव,बापूजी साळुंखे, मुख्याध्यापक विश्वेश्वर तथा अतुल आमंदे,अवधूत आमंदे, जयवंत बडदरे, संजय गोगटे, किरण भोसले, सुहास व्यास, कल्याणी गायकवाड, सचिन जाधव,ऍड.विलास वहागावकर, अनिल वीर आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थीत होते. कमलजी बायस (पुणे) यांनी सूत्रसंचालन केले.
माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्यासह अन्य महनीय व्यक्तींना आदरांजली अर्पण करण्यात आले.राजेंद्रसर यांनी प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त केले.
सुनील वाघमळे यांचा संगीत क्षेत्रातील अनुभव वयाच्या १० व्या वर्षापासून आहे.त्यांनी मृदुंग व तबला याचे शिक्षण गुरुवर्य कै. गणपत बुवा घागरे (जोतिबाचीवाडी) यांचेकडे घेतले होते. पुढे मदन कदम व शाम सुतार यांचे मार्गदर्शन मिळाले होते.वारकरी सांप्रदाय तालुका सातारा व जावली या विभागामध्ये अनेक कीर्तन व भजन यांना साथ संगत देत आहेत. तसेच अनेक नाटक व एकांकिका यांना संगीत संयोजन महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंडळामध्ये पुरस्कार निवड समितीमध्ये ३ वर्ष सदस्य म्हणून काम पाहिले आहे. दूरचित्रवाणी व आकाशवाणीवर अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाला साथ संगत देत आहेत.याबद्धल अनेकांनी अभिनंदन केले आहे.
फोटो : सुनील वाघमाळे यांना पुरस्कार प्रदान करताना मान्यवर.
Comments
Post a Comment