मधूमक्षीसारखे विद्यार्थ्यांनी ज्ञानचक्षू व्हावे – प्रा. व. बा. बोधे.

 मधूमक्षीसारखे विद्यार्थ्यांनी ज्ञानचक्षू व्हावे – प्रा. व. बा. बोधे.

---------------------------------- 

वाई प्रतिनिधी 

कमलेश ढेकाणे 

---------------------------------- 

वाई.  येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील  ग्रंथालय विभाग  आयोजित  ‘वाचन कौशल्य : तंत्र व विकास’ या पाच दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. 

 प्रा. बोधे म्हणाले, चांगले वाचणे व चांगले ऐकणे हा महत्वाचा संस्कार असून, पुस्तकासारखा दुसरा मित्र नाही. उत्तम पुस्तके व उत्तम कलाविष्कार विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये खरे रंग भरतात. वाचनाचे महत्व सांगताना त्यांनी आपण लहानपणापासून कसा उत्तम वाचक होतो व अनेक नाटके व भाषणे ऐकण्यसाठी अनेक ठिकाणी पायपीट केल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी झपाटून टाकल्यासारखे वाचावे तरच आपण एक सुसंस्कृत व उत्तम नागरिक होऊ शकतो असे त्यांनी सांगितले. 

विचारवंत कळण्यासाठी पुस्तके वाचलीच पाहिजेत. ज्ञानी व्हायचे असेल तर, वाचनाशिवाय पर्याय नाही. उत्तम पुस्तके आपल्याला शुद्ध आचार-विचार तसेच उच्चारसुद्धा शिकवितात. विद्यार्थ्यांनी  मधूमक्षीसारखे ज्ञान ग्रहण करावे. आयुष्यभर वाचनाद्वारे कणाकणांनी ज्ञान मिळवावे. प्रज्ञावंत व प्रतिभावंत होण्यासाठी पुस्तकांशी मैत्री व वाचनाचा ध्यास घेतला पाहिजे. त्यांनी आपल्या भाषणातून ऐतिहासिक नाटकांतील प्रसंग प्रेक्षकांच्या समोर उभे केले व वय वर्षे ७६ असूनही आपल्या स्मरणशक्तीची चुणूक दाखविली. सर्व श्रोते व्याख्यानामध्ये मंत्रमुग्ध झाले होते. एक प्रतिभावंत लेखक, कथाकथनकार व सुप्रसिद्ध वक्त्याला ऐकल्याचे भाग्य लाभल्याचे अनेकांनी सांगितले.

आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये प्रभारी प्राचार्य डॉ. ज्ञानदेव झांबरे म्हणाले, विद्यार्थीदशेत ग्रंथांशी केलेली मैत्री भविष्यात उत्तम नागरिक, संशोधक व माणसातला माणूस घडण्यास मदत करते. प्रतिकूल परिस्थितीतही विद्यार्थ्यांनी शिक्षणाची कास धरली पाहिजे. प्रा. बोधे सरांच्या व्यक्तिमत्वामधील अनेक गुण घेण्यासारखे आहेत.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल डॉ. शिवाजी कांबळे यांनी केले. पाहुण्यांची ओळख प्रा.(डॉ.) सुनील सावंत यांनी करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सुमती कांबळे यांनी केले. डॉ. धनंजय निंबाळकर यांनी आभार मानले. 

कार्यक्रमासाठी कला शाखेचे उपप्राचार्य प्रा.(डॉ.) चंद्रकांत कांबळे, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. हनुमंत कणसे, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य श्री. भीमराव पटकुरे, प्रा.(डॉ.) सुनील सावंत, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. बाळासाहेब कोकरे, प्रा.(डॉ.) विनोद वीर, नॅकचे सह - समन्वयक डॉ. बाळासाहेब मागाडे, श्रीमती दीक्षा मोरे, डॉ. अमोल कवडे, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालय प्रमुख श्री. बाळासाहेब टेमकर, सहायक ग्रंथपाल श्री. धनाजी जाधव व इतर ग्रंथालयीन कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचारी व महाविद्यालयातील ज्ञानचक्षू विद्यार्थी बहुसंखेने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.