मन प्रफुल्लित करणारे वातावरण; निसर्ग संपदेसह पाटगाव जलाशयाकडे पर्यटक वाढले.मन प्रसन्नतेसाठी पश्चिम भुदरगडकडे पर्यटकांचा ओढा.
मन प्रफुल्लित करणारे वातावरण; निसर्ग संपदेसह पाटगाव जलाशयाकडे पर्यटक वाढले.मन प्रसन्नतेसाठी पश्चिम भुदरगडकडे पर्यटकांचा ओढा.
---------------------------------------
भुदरगड प्रतिनिधी .
स्वरूपा खतकर
---------------------------------------
रोजच्या ताणतणावातून थोडीशी मुक्ती मिळवण्यासाठी आणि मनाला प्रफुल्लित करण्यासाठी लोकांचा पश्चिम भुदरगड परिसराकडे ओढा वाढलेला आहे,'माईंडफूलनेस' साठी भुदरगड तालुक्यातील तीन जलाशय आणि चिवाळे मठगावचा गंगोत्री परिसर हा निश्चितच वरदान ठरत आहे. येथील निसर्ग संपदा आल्हाददायक वातावरण आणि जलाशय याचे नेत्रसुख लुटण्यासाठी अलीकडे पर्यटक संख्या वाढू लागली आहे.
कोल्हापूर जिल्ह्याचा ऑक्सिजन पार्क म्हणून भुदरगड तालुक्याला ओळखले जाते येतील मौनी सागर जलाशय आणि मेघोली चिवाळे कोंडोशी हे मोठे तलाव या धरण क्षेत्रातील दऱ्याखोऱ्यातील आणि मठगाव चिवाळे शिवडाव नाईकवाडी येथील हिरवीगार वनराई याची भुरळ प्रत्येकालाच पडते अलीकडच्या धगधगत्या जीवनात धावपळीच्या युगात माणसाच्या मनाला गारवा मिळावा असे वाटू लागले आहे आणि साहजिकच त्यामुळे कोल्हापूरपासून काही अंतरावर असलेला हा तालुका पर्यटकांना साद घालत असल्याचे पर्यावरण प्रेमी नानाश्री पाटील यांनी सांगितले. हक्काचे आणि तितकेच सुरक्षित पर्यटनस्थळ म्हणून प्रतिवर्षी पर्यटकांची संख्या याठिकाणी वाढतच आहे.
भुदरगड तालुक्यातील कडगाव येथून सुरू होणारे मोठमोठे डोंगर घनदाट जंगलाच्या परिसरामधून जाणारी नागमोडी वळणे घेत घाटमाथ्यावरील रस्ते याची अनुभूती तळकोकणात आल्याचा पर्यटकांना भास होतो त्याचबरोबर मौनीसागर जलाशयाच्या बॅक वॉटरला तांब्यावाडीची सातेरीदेवी व हनुमंते गावचे हनुमंता मंदिराच्या पायथ्याशी मोठ्या संख्येने पर्यटक सहकुटुंब सहलीला येत आहेत तसेच येथून जवळच कोकणकड्यावरून सह्याद्रीचे रुद्र-रूप सौंदर्य पाहता येत असल्याने पर्यटकांची संख्या वाढत आहे याचा फायदा कडगाव तांबाळे परिसरातील व्यवसायिकांना होत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.
चौकट- पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी दळणवळण याची मोठ्या प्रमाणावर गरज भासत आहे त्यापैकी चिक्केवाडी तांब्याचीवाडी भटवाडी हनुमंते चिवाळे या ठिकाणी बारमाई रस्त्याचे डांबरीकरण मजबूत होणे तितकेच महत्त्वाचे आहे.
पर्यावरण प्रेमी
नानाश्री पाटील ( नांदोली)
फोटो - पर्यटकांना भुरळ घालणारे मौनी जलाशय पाटगाव
Comments
Post a Comment