नायगावातून क्रांतिज्योत आणून ज्ञानज्योती सावित्रीबाईंना अभिवादन.
नायगावातून क्रांतिज्योत आणून ज्ञानज्योती सावित्रीबाईंना अभिवादन.
----------------------------------
वाई प्रतिनिधी
कमलेश ढेकाणे
----------------------------------
किसन वीर मधील एनएसएस व स्पर्धा परीक्षा केंद्राचा उपक्रम; महाविद्यालयात अभिवादन
वाई, ता. ३: सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व पोलिस भरतीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या विद्यार्थ्यांनी नायगाव ते वाई क्रांतिज्योत आणून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले.
किसन वीरच्या एनएसएस विभागाने सावित्रीबाई फुले यांचा १९४ वा जयंती सोहळा साजरा करताना महाविद्यालयाची परंपरा अबाधित ठेवून नायगाव या सावित्रीबाईच्या जन्मगावातून वाईपर्यंत क्रांतिज्योत आणण्याचे ठरविले. हे नियोजन चालू असतानाच, पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनीही येण्याचा मानस व्यक्त केला. त्यास प्राचार्य डॉ गुरुनाथ फगरे यांनी पाठबळ दिले. प्रकल्प अधिकारी डॉ. संग्राम थोरात, पोलिस भरतीचे प्रशिक्षक विशाल महांगडे यांनी नेटके नियोजन केले. या उपक्रमात डॉ. अंबादास सकट, डॉ. राजेश गावित, तानाजी हाके यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमासाठी प्रा. (डॉ.) विनोद वीर, डॉ. संदीप वाटेगावकर, राजेंद्र जायकर, जितेंद्र चव्हाण, संपतराव जमदाडे यांनी परीश्रम घेतले.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांचे शोषण, अस्पृश्यता, अंधश्रद्धा आणि स्त्री शिक्षणासाठी केलेला संघर्ष त्यांच्यासाठी प्रेरणादायी असल्याचा मानस सर्व सहभागी स्वयंसेविकांनी व विद्यार्थिनींनी बोलून दाखविला व नायगाव ते वाई क्रांतिज्योत आणताना मुलांच्या बरोबरीने त्यांनीही ज्योत घेऊन सक्रिय सहभाग घेतला. क्रांतिज्योत महाविद्यालयात येताच प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, उपप्राचार्य प्रा. (डॉ.) चंद्रकांत कांबळे , डॉ . हणमंतराव कणसे, श्री. भीमराव पटकुरे, ज्येष्ठ प्राध्यापक (डॉ.) सुनील सावंत, प्रा. (डॉ.) ज्ञानदेव झांबरे, सर्व प्राध्यापक तसेच डॉ. मंजूषा इंगवले व सर्व महिला प्राध्यापकांनी जल्लोषात स्वागत केले व सुशोभित रांगोळी काढून महाविद्यालयाच्या दर्शनी भागात ज्योत ठेवली. या प्रसंगी प्राचार्य डॉ. फगरे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
**********चौकट*********************
*मदनदादांची तत्परता*
संस्थेचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांचे विद्यार्थ्यांच्या उपक्रमावर नेहमीच लक्ष असते. आजही मदनदादा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यासाठी व शासकीय कार्यक्रमासाठी नायगावला निघाले होते, महाविद्यालयातील विद्यार्थी ज्योत आणण्यासाठी आले आहेत हे त्यांना प्रवासात असताना समजले, त्यांनी फोनवरून सर्वांना शुभेच्छा दिल्या व ते मार्गस्थ झाले, यातून मदनदादांची कार्यतत्परता दिसून येते.
Comments
Post a Comment