बांबू लागवड या शासनाच्या महत्वकांक्षी अभियानाततालुका समन्वयकपदी प्रभाकर नाईकवाडे यांची नियुक्ती.
बांबू लागवड या शासनाच्या महत्वकांक्षी अभियानाततालुका समन्वयकपदी प्रभाकर नाईकवाडे यांची नियुक्ती.
--------------------------------
रिसोड प्रतिनिधी
रणजीत सिंह ठाकुर
-------------------------------
बांबू लागवड या शासनाच्या विशेष महत्वकांक्षी अभियान यशस्वी होण्याच्या अनुषंगाने वातावरण बदल आणि पर्यावरण रोखण्यासाठी, तसेच वृक्ष लागवड बळकट करण्यासाठी ईश्वेद बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या रिसोड तालुका समन्वयकपदी रिसोड तालुक्यातील युवा पत्रकार प्रभाकर नाईकवाडे यांची निवड करण्यात आली आहे. समुहाचे अध्यक्ष संस्थापक डॉ. संजय वायाळ यांच्या सहीचे नियुक्तीपत्र त्यांना देण्यात आले आहे.
त्यांच्यावर संघटनेच्या बांधणीची आणि शेतकऱ्यांच्या सबलीकरणासाठी काम करण्याची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांना पर्यावरण संवर्धनासंदर्भात प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा घडवून आणणे हा त्यांचा मुख्य उद्देश असेल.
नाईकवाडे यांच्याकडून या क्षेत्रातील कार्याला नवीन दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल परिसरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक प्रबोधनासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा उल्लेख सर्वत्र होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.नाईकवाडे यांच्या या नव्या जबाबदारीने त्यांचे कार्यक्षेत्र विस्तारले असून, पर्यावरण रक्षण व शेतकऱ्यांच्या हितासाठी ते नवे उपक्रम राबवतील, असा विश्वास आहे.
Comments
Post a Comment