मुरगूडच्या " श्री आत्मरूप गणेश " मंदिरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन.
मुरगूडच्या " श्री आत्मरूप गणेश " मंदिरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन.
----------------------------------
मुरगूड प्रतिनिधी
जोतीराम कुंभार
-----------------------------------
मुरगूड येथिल नवमहाराष्ट्र मंडळ प्रणित भाविकांचे श्रद्धास्थान असलेले व गणेश जयंतीनिमित्य व
" श्रीआत्मरूप गणेश मंदिराच्या २९ व्या वर्धापनदिनानित्य विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे .
शुक्रवार दि .३१ / १ / २०२५ रोजी वैभव लक्ष्मी कोल्हापूर यांच्या मार्फत रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे . यावेळी प्रत्येक रक्तदात्यानां नवमहाराष्ट्र मंडळामार्फत गिप्ट देण्यात येणार आहेत .
शनिवार दि .१ / २ / २०२५ रोजी सकाळी ८वाजता तुरंबे ता . राधानगरी येथिल ज्ञानोबा तुकोबा अध्यात्मिक वारकरी लहान मुलांची शैक्षणिक संस्थाची दिंडी सोहळा व ह . भ .प. युवा किर्तनकार ओंकार महाराज सूर्यवंशी यांचा या दिंडीत सहभाग असणार आहे . या सोहळ्यानंतर दुपारी १२ वाजता श्रींचा जन्मकाळ सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न होणार आहे . तसेच रात्री ९ वाजता मुरगूड येथिल संत बाळूमामा मंडळाचे भजन होणार आहे .
रविवार दि .२ / २ / २०२५ रोजी सकाळी ७ वाजून ३० मिनिटानीं होम -हवन , महाआरती व दुपारी १२ वाजता महाप्रसाद अशा नियोजनबद्ध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे . सर्व भाविक- भक्तानीं सर्व कार्यक्रमांचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक
" नवमहाराष्ट्र क्रिडामंडळ" व सर्व तरुण मंडळानीं केले आहे .
Comments
Post a Comment