बगडिया महाविद्यालयात वाचन कौशल्य कार्यशाळा.
बगडिया महाविद्यालयात वाचन कौशल्य कार्यशाळा.
----------------------------------
रिसोड प्रतिनिधी.
रणजीत सिंह ठाकुर
----------------------------------
उत्तमचंद बगडिया कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात1 जानेवारी 2025 ला वाचन पंधरवाडा निमित्त वाचन कौशल्य कार्यशाळेचे तसेच सामूहिक वाचन या उपक्रमाचे आयोजन ग्रंथालय विभागाद्वारे करण्यात आले. प्रस्तुत कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . विनोद कुलकर्णी यांनी दीप प्रज्वलित करून केले.प्राचार्य डॉ . विनोद कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना वाचन संस्कृती ही विद्यार्थी जीवनात कसे आमुलाग्र बदल घडवून आणू शकते याचे विविध दाखले सउदाहरण देऊन वाचनाकरिता प्रेरित केले व वाचन पंधरवाडा हा नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच साजरा करावयाच्या असल्यामुळे नवीन वर्षाच्या संकल्पामध्ये रोज वाचन करणार असा संकल्प विद्यार्थ्यांकडून वदवून घेतला व तो पूर्णत्वास जाईल असा आशावाद व्यक्त केला. वाचन कौशल्य कार्यशाळेचे प्रमुख वक्ते प्रा . एस व्ही टीकार यांनी कोणती पुस्तकं वाचावी व कशी वाचावी याबद्दल मार्गदर्शन केले.वाचन कौशल्याची मूलभूत संकल्पना विद्यार्थ्यांना समजावून सांगितली.विद्यार्थ्यांनी कोणते पुस्तक हे चवीकरिता व कोणते पुस्तक हे डायजेस्ट करीता आहेत याची उकल विविध उदाहरण देऊन विद्यार्थ्यांनी वाचन पंधरवडा कसा स्वतः वाचण्याकरता झोकून देऊन साजरा करता येईल याकडे लक्ष वेधले. वाचन कौशल्य कार्यशाळेचे व सामूहिक वाचन या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.जयंत मेश्राम यांनी केले.कार्यशाळेला वाचन संकल्प महाराष्ट्राचा आयोजन समितीचे सदस्य डॉ.मंगला खेडेकर, डॉ. ए . जी . वानखेडे यांचे विशेष सहकार्य लाभले.संचालन कु. उर्मिला गिरी व आभार प्रदर्शन कु .वैष्णवी घोडे हिने केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता कु. रिया श्रीधर रोडे, कु.वैष्णवी राजुरकर , कु. मोहिनी कोठारी, कु. संध्या काळे यांनी सहकार्य केले.
प्रस्तुत कार्यशाळेला डॉ. बुधवंत , प्रा . नरवाडे, प्रा. काळे, प्रा . वानरे, मानमोठे मॅडम , श्री सुनील चराटे तसेच बहुसंख्य विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
Comments
Post a Comment